हार्दिक पंडय़ावर पाठीची शस्त्रक्रिया

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-06 05:03:00

img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ावर शनिवारी पाठीची यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली असून यामुळे तो किमान 4 महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पंडय़ाला 12 ते 16 आठवडे (3 ते 4 महिने) विश्रांती घ्यावी लागू शकते आणि आगामी आयपीएल स्पर्धेपूर्वी तो पूर्ण तंदुरुस्त होऊ शकतो.

‘दि. 22 सप्टेंबर रोजी बेंगळूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यानंतर हार्दिक पंडय़ाने कमरेत वेदना जाणवत असल्याचे सांगितले आणि बीसीसीआय वैद्यकीय पथकाने इंग्लंडमधील स्पाईन तज्ञांचा याबाबत सल्ला घेतला. प्रदीर्घकालीन उपाययोजना नजरेसमोर ठेवत या तज्ञांनी शस्त्रक्रिया करवून घेण्याची सूचना केली आणि त्यानुसार शनिवारी पंडय़ाच्या पाठीवर शस्त्रक्रिया केली गेली आहे’, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.

‘पंडय़ा भारतीय संघाचे फिजीओ योगेश परमार यांच्यासह दि. 2 ऑक्टोबर रोजी लंडनला रवाना झाला आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया केली गेली’, असेही मंडळाने नमूद केले. नंतर स्वतः पंडय़ानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शस्त्रक्रियेची माहिती दिली. शिवाय, चाहत्यांकडून येणाऱया शुभेच्छांबद्दल आभारही व्यक्त केले.

बडोद्याचा हा दिग्गज अष्टपैलू भारतीय संघातील स्पीडस्टार जसप्रित बुमराहनंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. स्वतः बुमराह सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतून स्ट्रेस प्रॅक्चरमुळे बाहेर फेकला गेला आहे. हार्दिकने कसोटी मालिकेतून बाहेर होण्यापूर्वी टी-20 मालिका खेळली. पण, यादरम्यान त्याच्या पाठदुखीचे स्वरुप स्पष्ट झाले होते. हार्दिकला गतवर्षी सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीत संपन्न झालेल्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान दुखापतीचे पहिले संकेत जाणवले. त्यानंतर आयपीएल व विश्वचषक स्पर्धेसाठी तो वेळीच तंदुरुस्त झाला होता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN