हार्दिक पंडय़ावर यशस्वी शस्त्रक्रिया
ऑनलाईन टीम / लंडन :
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज, ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पंडय़ा लवकरच क्रिकेट संघात परतू शकतो. हार्दिकवर लंडनमध्ये पाठीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या एक वर्षापासून हार्दिक या दुखापतीने त्रस्त होता. पंडय़ा ने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली.
पंडय़ा म्हणाला, माझ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झालीय. तुम्हीं सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद!! टीम इंडियामध्ये पुनरागमनासाठी किती वेळ लागेल मला माहीत नाही. लवकरच परत येईन. मात्र, तोपर्यंत तुम्ही मला विसरू नका.