हार्दिक पांड्या 'या' अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात?

Indian News

Indian News

Author 2019-10-20 23:04:00

img

भारतीय ऑल-राऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या हा क्रिकेटशिवाय इतर गोष्टींकरता ही अनेकदा चर्चेत असतो. एली अवराम असो ईशा गुप्ता किंवा उर्वशी रौतेला असो, हार्दिक पंड्या यांचे नाव या सर्वांशी अनेकदा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या कारणावरून जोडले गेले तसेच तो त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत राहिला आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा त्याचे हृदय नताशा स्टैंकोविकवर आले आहे, जी सध्या तिच्या पुर्वीच्या प्रियकर एली गोनीसोबत नच बलिये ९ मध्ये दिसत आहे.

क्रिकेटच्या मैदानावर जबरदस्त कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेला हार्दिकने नताशाची ओळख तिच्या चुलतभावांनाच नव्हे तर तिच्या आई-वडिलांशीही करून दिली.

यावर्षी मे महिन्यात नताशाचे त्याच्या घरी जोरदार स्वागत झाले. हार्दिक पांड्याच्या चुलतभावाची जेव्हा तिला पहिली भेट झाली, त्यावेळी ती पहिल्यांदा संपूर्ण पांड्या कुटुंबाला भेटली होती.

हार्दिकच्या कुटूंबियांना त्यांच्या या नात्यावर आक्षेप नसून हार्दिक पंड्याच्या निवडीबद्दल पांड्या परिवार आनंदी आणि खूश आहे. नताशा आणि हार्दिक हे एकमेकांना आधीपासून ओळखत असल्याचेही त्याने सांगितले आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD