हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, रोहित 'हिट' है भाई.

Indian News

Indian News

Author 2019-10-02 22:10:17

img

विशाखापट्टणममध्ये बुधवारी (2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात झाली. या मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु झाला. या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 59.1 षटकात बिनबाद 202 धावा केल्या आहेत.

यामध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. हा त्याचा कसोटी सलामीवीर म्हणून पहिलाच सामना आहे. रोहितने आज 174 चेंडूत 12 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 115 धावा काढल्या आहेत. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील एकूण चौथे तर कसोटी सलामीवीर म्हणून पहिलेच शतक आहे.

तसेच रोहितला आज मयंक अगरवालने 183 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 84 धावा करत चांगली साथ दिली आहे.

आजच्या दिवसाच्या खेळानंतर रोहितने केलेल्या या शानदार शतकी खेळीबद्दल भारताच्या काही आजी-माजी खेळाडूंनी ट्विट करत रोहितचे कौतुक केले आहे.

यामध्ये रोहितचा माजी संघसहकारी आणि भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने रोहितसाठी खास ट्विट केले आहे. हरभजनने ट्वीट केले आहे की, 'व्वा! रोहित शानदार शतक, जर्सी निळी असो किंवा पांढरी काही फरक पडत नाही. रोहित 'हिट' आहे.'

भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने ट्विट केले आहे की 'रोहित शतकाबद्दल अभिनंदन. त्याने सुरुवात जशी केली आणि नंतर स्थिरावल्यावर जसा नैसर्गिक खेळ केला, हे पाहताना मजा आली. मयंकनेही परिपक्व खेळी केली. दोन्ही खेळाडूंसाठी मोठी शतके करण्याची चांगली संधी आहे.'

तसेच भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने 'दिग्गज' म्हणत रोहितने कौतुक केले आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने रोहितने संधीला दोन्ही हातांनी पकडले, असे म्हटले आहे.

या सामन्यात आज पावसाचा व्यत्यय आल्याने पहिल्या दिवसाचा खेळ दुसऱ्या सत्रानंतर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या भारतीय संघा पहिल्या डाव 59.1 षटके आणि बिनबाद 202 धावांपासून पुढे सुरु होईल.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN