हिंदुस्थानात पहिल्यांदाच डे-नाइट कसोटीचा धमाका

Indian News

Indian News

Author 2019-10-30 07:40:00

img

हिंदुस्थानला मायदेशातच नव्हे तर परदेशातही घवघवीत यश मिळवून माजी कर्णधार सौरभ गांगुली याने बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर रूढ होताच मंगळवारी ऐतिहासिक निर्णय घेतला. क्रिकेट जगतातील बहुतांशी देशांनी 'डे-नाइट' कसोटीला ग्रीन सिग्नल दाखवल्यानंतरही हिंदुस्थान यापासून दूर होता . मात्र कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी मिळावी यासाठी सौरभ गांगुलीने विद्यमान कर्णधार विराट कोहलीशी चर्चा करून

' डे - नाइट ' कसोटीच्या आयोजनाबद्दल पाऊल उचलले . त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डालाही ' डे - नाइट ' कसोटीसाठी त्याने राजी केले . यामुळे आता 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर हिंदुस्थान - बांगलादेश यांच्यामध्ये ' डे - नाइट ' कसोटी रंगणार आहे . हिंदुस्थानातील ही पहिलीच ' डे - नाइट ' कसोटी असेल . तसेच टीम इंडिया व बांगलादेशही पहिल्यांदाच ' डे - नाइट ' कसोटी खेळणार आहे .

11 कसोटी … आठ देश .. अन् चार वर्षे

गुलाबी चेंडूने ' डे - नाइट ' कसोटी खेळवण्यात येते . या गुलाबी चेंडूचा दर्जा तसेच यामुळे खेळताना होणार परिणाम यामुळे टीम इंडियाने याला सातत्याने विरोध केला . मात्र सौरभ गांगुलीने बीसीसीआयमध्ये कार्यरत होताच ' डे - नाइट ' कसोटीला हिरवा कंदील दाखवला . याआधी 27 नोव्हेंबर 2015 रोजी ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड यांच्यामध्ये ऍडलेड येथे पहिला ' डे - नाइट ' कसोटी सामना खेळण्यात आला होता . आतापर्यंत आठ देशांनी ' डे - नाइट ' कसोटी खेळली आहे . तसेच 11 ' डे - नाइट ' कसोटींचा थरार तमाम क्रिकेटप्रेमींनी अनुभवला आहे . तब्बल चार वर्षांनंतर हिंदुस्थान व बांगलादेशचा संघ ' डे - नाइट ' कसोटी खेळणार आहे .

दिग्गजांचा होणार गौरव

कोलकात्यात होणाऱ्या या कसोटीत क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल व बीसीसीआय यांच्या वतीने दिग्गज खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे . यामध्ये अभिनव बिंद्रा , पी . व्ही . सिंधू , मेरी कोम यांचा समावेश आहे .

गुलाबी चेंडूच्या दर्जाविषयी चिंता

बीसीसीआयकडून ' डे - नाइट ' कसोटीला हिरवा कंदील दाखवण्यात आला असला तरी पुढील आव्हानासाठी त्यांना सज्ज राहावे लागणार आहे . गुलाबी चेंडूच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्हं आहेत . हिंदुस्थानातील वातावरण व खेळपट्टय़ांवर त्याचा निभाव लागणार का , हाही एक प्रश्नच . त्यामुळे आता बीसीसीआय पहिल्यावहिल्या ऐतिहासिक कसोटीआधी कशा प्रकारे सज्ज होतेय हे पाहणे रंजक ठरणार आहे .

दरवर्षी होणार कसोटी

ब्रेस्ट कॅन्सरच्या जनजागृतीसाठी ऑस्ट्रेलियात दरवर्षी पिंक कसोटीचे आयोजन करण्यात येते . अगदी त्याचप्रमाणे कोलकात्यातही दरवर्षी ' डे - नाइट ' कसोटीचे आयोजन करण्यात येणार आहे . सौरभ गांगुलीकडून यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत .

द्रविडशी करणार चर्चा

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD