ही तर टी-20 वर्ल्डकपच्या आधीची झलक आहे; ICCने शेअर केला Video

News18

News18

Author 2019-10-31 11:30:00

img

दुबई, 31 ऑक्टोबर: दुबईत सध्या वर्ल्डकप टी-20साठीच्या पात्रता फेरीतील सामने सुरु आहेत. पात्रता फेरीतील हे सामने तुलनेने दुबळ्या संघात होत असेल तरी या सामन्यात अनेक शानदार खेळी पाहायला मिळत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या पात्रता फेरीतील संयुक्त अरब अमिरात विरुद्ध स्कॉटलंड सामन्यात असाच एक अफलातून कॅच पाहायला मिळाला. या कॅचचा व्हिडिओ सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

टी-20 वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्यासाठी सध्या चुरस पाहायला मिळत आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात युएईच्या रमीज शहजाद याने एक शानदार कॅच घेतला. त्याने स्कॉटलंडच्या जॉर्ज मंसी याचा कॅच सीमे रेषेवर पकडला. रमीझने हवेत उडी मारत एका हाताने जॉर्जचा कॅच पकडला. त्याचा हा कॅच पाहिल्यानंतर सर्वांना इंग्लंडचा अष्ठपैलू फलंदाज बेन स्ट्रोक्सने वर्ल्डकपमधील कॅचची आठवण आली. आयसीसीने रमीझ आणि स्ट्रोक्स या दोघांच्या कॅचचा व्हिडिओ एकत्र शेअर केला आहे.

या सामन्यात जॉर्जने आक्रमक खेळी केली. तो 65 धावांवर असताना षटकार मारण्याच्या प्रयत्नात अहमद रजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 198 धावा केल्या होत्या. बदल्यात युएईला 108 धावाच करता आल्या. या विजयासह स्कॉटलंडने पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळवला आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD