१६ वर्षाचा मुलगा PUBG खेळता खेळता हे जग सोडून गेला

Jagruk News

Jagruk News

Author 2019-10-26 01:31:33

१६ वर्षाचा फुरकान १२ वीच्या वर्षाला होता. पण अगदी दीड वर्षापासून त्याला मोबाईल मध्ये गेम खेळण्याची लत लागली अगदी व्यसन म्हणा ना! अख्खा दिवस तो मोबाईल मध्ये PUBG खेळत बसायचा खेळताना इतका गुंग व्हायचा की त्याला आजूबाजूच्या कोणत्याच गोष्टीची भान नसायचं. PUBG मध्ये तो इतका बुडाला होता की, त्याला खर काय नि खोट काय यातील फरक कळायचा नाही.

imgCopyright Holder: Jagruk News

तो त्या गेम मधील कॅरेक्टर मध्ये स्वतला पहायचा. त्याचे आई वडील सांगतात की, तो PUBG खेळत असला की, स्वतः जोरजोरात ओरडायचा कधी जर त्याच्या हातातून मोबाईल घेतला तर मात्र तो हट्टाला पेटायचा, जेवण बंद करायचा त्यामुळे घरातील ही त्याच्या या हट्टापुढे हतबल झाले होते. फुरकान च्या एका नातेवाईकाकडे त्या दिवशी लग्न समारंभाचा कार्यक्रम होता त्यामुळे त्याची सर्व फॅमिली आणि तो तिकडे गेला होता.

imgSource Google

त्याच दिवशी दिवसभर मग रात्री २ वाजेपर्यंत त्याने PUBG खेळत होता त्यानंतर पुन्हा सकाळी उठून तेच खेळत बसला आजुबाजूच कशाच भान नव्हतं त्याला शेजारीच त्याची छोटी बहीण ही होती पण अचानक खेळता खेळता फुरकान ला आपला खेळाडू एका धमक्यात मरताना पाहून तो ही जोरजोरात ओरडत असतो आणि अचानक तो बेशुद्ध होतो हे सगळं जवळ असलेली त्याची बहीण पाहत असते. त्याला तत्काळ हॉस्पिटल मध्ये नेण्यात येते परंतु तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अचानक धक्क्यामुळे हृदय बंद ( कर्डियाक अरेस्ट) मुले त्याचा मृत्यू झाला असे डॉक्टरांचे म्हणणे होते.


ब्रेकिंग न्यूज़, मनोरंजन, बॉलीवुड, क्रिकेट, लाइफस्टाइल, राजकारण, ह्या संदर्भातल्या सर्व बातम्या फक्त एका CLICK वर, वाचण्यासाठी लगेच आमचे चॅनल फॉलो करा.
READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD