२०१८-१९ च्या विजेत्या मुंबईला छत्तीसगडचा दे धक्का!

Indian News

Indian News

Author 2019-09-30 00:41:50

img

-शंतनु कुलकर्णी

भारतात सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत मुंबईचे सौराष्ट्र व झारखंडविरुद्धचे सामने पावसामुळे खेळविले गेले नव्हते. त्यामुळे ते दोन्ही सामने आता अनुक्रमे १ ऑक्टोबर व १६ ऑक्टोबरला खेळविण्यात येणार आहे. त्यामुळे २८ सप्टेंबरला झालेला छत्तीसगडविरुद्धचा सामना मुंबईसाठी २०१९ च्या विजय हजारे चषकातील पहिलाच सामना होता.

कर्णधार श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव यांसारख्या तगडे फलंदाज तर धवल कुलकर्णी सारखा अनुभवी गोलंदाज संघात असल्याने मुंबईचे पारडे वरचढ होते.

छत्तीसगड़चा कर्णधार हरप्रित सिंगने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

मुंबईकडुन यशस्वी जैस्वाल पदार्पणाचा सामना खेळत होता.

मुंबईकडुन सलामीला आलेल्या जय बिश्ट व आदित्य तरेने सावध सुरुवात केली होती. या दोघांनी १०.३ षटकांत ३९ धावांची सलामी दिली. बिश्ट (२४) बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या युवा यशस्वी जैस्वालला सोबत घेत तरेने संघाचा डाव पुढे नेला. तरे व जैस्वालची जोडी संघाला मोठी धावसंख्या उभारुन देईल असे दिसत असतानाच सुमित रुईकरने जैस्वालला ४४ धावांवर बाद करत मुंबईची अवस्था ३०.४ षटकांत १२९ केली होती.

छत्तीसगड समोर मोठे आव्हान ठेवण्याची जिम्मेदारी कर्णधार अय्यर व तरे वर आली होती त्यातच तरेनी आपले अर्धशतक साजरे केले होते. अय्यरने आक्रमक पवित्रा घेत धावसंख्या वाढवण्यावर भऱ दिला. पण तरे (९०) तर अय्यर (५०) बाद झाले तेव्हा मुंबईने ४४.६ षटकांत ४ गडी गमावत २३८ धावा केल्या होत्या.

आता शेवटच्या ३२ चेंडूत मुंबईचा संघ किती धावा करतो याकडे सर्वांचे लक्ष्य होते पण सुर्यकुमार यादव मात्र वेगळ्याच इराद्याने मैदानात आला होता आणि आल्या आल्याच त्याने चौफेर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली होती.

सुयर्कुमार यादव सर्वच गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत होता. शेवटी ८ चौकार व ६ षटकारांच्या सहाय्याने ३१ चेंडूत ८१ काढणारा सुर्यकुमार यादव डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. एकवेळ मुंबईचा संघ २६० ते २७० धावांपर्यंत पोहचु शकेल असे वाटत असताना सुर्यकुमारच्या ८१ धावांच्या वादळी खेळीने मुंबईचा संघ ३१७ धावांपर्यंत पोहचला.

महत्त्वाचे म्हणजे शेवटच्या ५ षटकांत मुंबईने तब्बल ८१ धावा ठोकल्या. छत्तीसगडकडुन शशांक सिंग व प्रताप सिंगने प्रत्येकी २ गडी बाद केले.

छत्तीसगड़सारख्या नवख्या संघाला ३१८ धावांचे आव्हान तसे मोठेच होते आणि त्यात ३१८ धावांचा पाठलाग करण्यासाठी छत्तीसगड़ संघाला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. पण ५ व्या षटकांत धवल कुलकर्णीने चंद्रशेखरला ५ धावांवर बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले.

पहिला गडी झटपट गमावल्यानंतर जिवनज्योत सिंग व आशुतोष सिंगने डाव सावरत धावगती ६ च्या आसपास राखली होती आणि छत्तीसगड़चा संघ चांगल्या स्थितीत दिसत होता. पण शम्स मुलानीने दोघांना बाद करत छत्तीसगड़ची अवस्था ३ बाद ९५ केली. त्यामुळे मुंबईने सामन्यांवर पकड मिळवली होती.

त्यानंतर बिष्टने छत्तीसगड़चा कर्णधार हरप्रित सिंगला २६ धावांवर बाद करत छत्तीसगड़ला चौथा धक्का दिला. तेव्हा छत्तीसगड़ला विजयासाठी २५ षटकांत १८७ धावांची आवश्यकता होती.

Related Posts

रोहित शर्माला कसोटीत ओपनिंग करण्याआधी लक्ष्मणने दिला.

Sep 29, 2019

एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल शिखर धवनने केले मोठे.

Sep 29, 2019

झटपट ४ गडी गमावल्यामुळे छत्तीसगड़ला अमनदिप खारे व शशांक सिंगकडुन चांगल्या भागिदारीची अपेक्षा होती. हळुहळु दोघेही धावा जोडत होते. पण या भागिदारीत खारे जास्त आक्रमक वाटत होता आणि बघता-बघता दोघांनी संघाला २०० चा टप्पा गाठुन दिला.

त्यातच मुलानीने शशांक सिंगला ४० धावांवर बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले तेव्हा छत्तीसगड़ला विजयासाठी ५८ चेंडूत ९६ धावांची आवश्यकता होती. छत्तीसगड़च्या संघाची जिम्मेदारी पुर्णपणे खारेवर होती.

शशांक सिंगनंतर अजय मंडलला सोबत घेत खारेने विजयाकडे आगेकुच चालु ठेवली. खारे व मंडलच्या फटकेबाजीमुळे छत्तीसगड़चा संघ विजयाजवळ पोहचला होता.

छत्तीसगडला शेवटच्या ७ चेंडूत २० धावांची अवश्यकता होती. त्यात तुषार देशपांडेने टाकलेल्या शेवटच्या षटकांतील पहिल्या दोन चेंडूवर अनुक्रमे चौकार व षटकाराच्या रुपात छत्तीसगडला 10 धावा मिळाल्या. त्यामुळे छत्तीसगड़ने विजय आपल्या आवाक्यात आणला होता.

शेवटी ४ चेंडूत ४ धावांची आवश्यकता असताना नाबद शतकी खेळी करणाऱ्या अमनदिप खारेने संघाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.

२०१८-१९ च्या सत्राचा विजेता मुंबई विरुद्ध विजय मिळवल्यामुळे छत्तीसगड़चा आत्मविश्वास नक्कीच वाढेल यात शंका नाही.

छत्तीसगड़कडुन खारेने ११७ धावांची नाबाद खेळी करत विजयात महत्त्त्वाची भुमिका निभावली तर मुंबईकडुन शम्स मुलानीने ३, विष्ट व धवलने प्रत्येकी १ गडी बाद केला.

मुंबईचा पुढील सामना १ ऑक्टोबरला रोजी सौराष्ट्राविरुद्ध तर छत्तीसगड़चा पुढील सामना २९ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशविरुदध खेळविण्यात येणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD