‘खेळ नाहीतर...’, दिग्गज क्रिकेटपटूनं धवनला दिली धमकी

News18

News18

Author 2019-11-06 12:57:00

img

राजकोट, 06 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला. पहिल्या टी-20 सामन्यात कोणत्याच फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. दरम्यान पहिल्या सामन्यात 42 चेंडूत 41 धावा करणाऱ्या शिखर धवनवर धिम्या गतीनं फलंदाजी केल्यामुळं टीका होत आहे. त्यामुळं शिखरला टी-20 क्रिकेटमध्ये आपले स्थान कायम राखण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे.

याआधी विजय हजारे करंडक स्पर्धेतही धवनला चांगली फलंदी करता आली नव्हती. सात डावांमध्ये धवननं फक्त 1 अर्धशतक लगावले होते. तर, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दौऱ्यातही धवनला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान आता दिग्गद क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धवनला टी-20मध्ये आपले स्थान कायम राखण्यासाठी खेळावे लागेल नाही तर संघाबाहेर व्हावे लागले, अशा शब्दात चेतावणी दिली.

वाचा-RCBच्या तिजोरीत खडखडाट, IPL लिलावात बसणार मोठा झटका

वर्ल्ड कप 2019मध्ये शतकी कामगिरी करणाऱ्या शिखर धवनला त्यानंतर कमबॅक करता आला नाही. याचबाबत सुनील गावस्कर यांनी, “जर धवन पुढच्या दोन टी-20 सामन्यात धावा करू शकला नाही कर त्याच्यावर नक्कीच टीक होईल”, असे सांगितले. तसेच गावस्कर यांनी, “तुम्ही 40-45 धावा त्याच चेंडूत करता त्याचा संघाला काही फायदा होत नसेल तर त्याबाबत विचार करायला हवा. एका अंतरानं क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला पुन्हा फॉर्ममध्ये येणे सोपे नसते”, असे सांगितले. पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2020मध्ये भारताकडे एक मजबूत संघ हवा, त्यात सलामीचा फलंदाज म्हणून धवनची संघाला जास्त गरज आहे.

वाचा-सचिनचा ‘मास्टर स्ट्रोक’ बदलणार वनडे क्रिकेटचा चेहरामोहरा!

सध्या भारत आयसीसी टी-20 रॅकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. यात सुधारणा करण्यासाठी बांगलादेश आणि पुढच्या मालिका महत्त्वाच्या आहेत. याबाबत बोलताना गावस्कर यांनी, “टी-20 वर्ल्ड कपच्या आधी भारतानं पाचव्या स्थानावरून तिसऱ्या किंवा दुसऱ्या स्थानावर येणे गरजेचे आहे. त्यासाठी सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागती. जर असे झाले नाही तर टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा प्रवास खडतर होईल”, असे सांगत भारताला सावध केले.

दरम्यान आता भारत-बांगलादेश यांच्यात दुसरा टी-20 सामना 7 नोव्हेंबरला राजकोट येथे होणार आहे. या सामन्यात भारताला विजय मिळवत 1-1नं बरोबरी मिळवण्याची संधी आहे. भारताला या टी-20 सामन्यातही पराभवाचा धक्का बसल्यास टीम इंडियाला ही मालिका गमवावी लागेल.

वाचा-IPLचे संघ जाणार अमेरिका दौऱ्यावर, मुंबई इंडियन्सचा अफलातून प्रस्ताव

पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD