‘या’ क्रिकेटरने धोनी आणि विराटलाही टाकले मागे 

Dainik Prabhat

Dainik Prabhat

Author 2019-11-07 16:01:00

img

अँटिग्वा – भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मंधानाने आपल्या करियरमधील मोठ्या विक्रमला गवसणी घातली आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान २००० धावा बनवणारी ती दुसरी क्रिकेटर बनली आहे. स्मृतीने ५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५१ डावांमध्ये विक्रम प्रस्थापित केला आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय सामन्यात स्मृती मंधानाने ही कामगिरी केली आहे. या सामन्यात तिने दमदार ७४ धावांची खेळी केली. तिने ५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४३.८ च्या सरासरीने २,०२५ धावा केल्या आहेत. स्मृतीच्या नावावर चार शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, सर्वात वेगवान धावा करणाऱ्या यादीत स्मृती दुसऱ्या स्थानावर तर पहिल्या स्थानावर शिखर धवन आहे. धवनने एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८ डावांमध्येच २०००चा आकडा गाठला होता.

Ads

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD