‘रो-हिट’मुळे बांगलादेशचा पराभव

Deshdoot

Deshdoot

Author 2019-11-08 01:47:00

img

राजकोट । : महावादळाचा धोका टळल्याने निर्विघ्नपणे पार पडलेल्या राजकोट टी-20 मध्ये रोहितवादळ धडकले. कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढत भारताला शानदार विजय मिळवून दिला. रोहितने 43 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकार ठोकून 85 धावांची तुफानी खेळी केली. दरम्यान, या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली असून रविवार दि. 10 नोव्हेंबर रोजी नागपुरात होणारा तिसरा टी-20 सामना आता निर्णायक ठरणार आहे.

महावादळाच्या शक्यतेने राजकोटच्या सामन्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती पण हे वादळ गुजरात किनारी धडकण्याआधीच विरून गेल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. तरीही पावसाचा धोका कायम होता. बुधवारी सायंकाळी राजकोटमध्ये काहीवेळ पाऊसही झाला. मात्र आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. दुपारी राजकोटमध्ये कडक उन पडलं होतं. त्यामुळे अगदी सुरळीतपणे सामना होऊ शकला.

भारत-बांगलादेश यांच्यात दुसरा टी-20 सामना राजकोटमध्ये होता . या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खलील अहमदनं सामन्याच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा दिल्या. मात्र चहलच्या 6व्या ओव्हरमध्ये एक अजब प्रकार घडला. चहलच्या तिसर्‍या चेंडूवर लिंटन दास फलंदाजी करत होता. दास मोठा शॉट खेळण्याचा नादात क्रिझ सोडून पुढे गेला तेवढ्यात पंतनं त्याला स्टम्प आऊट केले. पंतनं जोरात केलेल्या अपीलमुळं पंचांनी तिसर्‍या पंचांकडे निर्णय सोपावला आणि दासला नाबाद घोषित करण्यात आले. दास नाबाद होण्यामागचे कारण म्हणजे ऋषभ पंत. आयसीसीच्या नियमानुसार स्टम्पआऊट करताना चेंडू हातात येण्याआधी ग्लोव्ह्ज स्टम्पच्या पुढे नसावेत. पंतबाबत असाच प्रकार घडला. पंतच्या या एका चुकीमुळं भारताला पहिली विकेट मिळाली नाही. पंतचे ग्लोव्ह्ज स्टम्पच्या पुढे असल्यामुळं तिसर्‍या पंचांनी नाबाद घोषित केले. त्यानंतर चहलनं हा टाकलेला चेंडूही नो-बॉल घोषित करण्यात आला. त्यामुळं चहलच्या या ओव्हरमध्ये 13 धावा गेल्या. त्यानंतर लगेचच पुढच्या ओव्हरमध्ये पंतनं बदला घेत दासला बाद केले.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN