‘हीटमॅन’ : ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय

Tarunbharat

Tarunbharat

Author 2019-10-04 17:21:00

img

ऑनलाइन टीम विशाखापट्टणम

भारतीय क्रिकेट संघाचा शिलेदार रोहित शर्मा यानं सलामीवीर म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात शतक ठोकून नवा विक्रम रचला आहे. एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक ठोकणारा रोहित शर्मा हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितनं आतापर्यंत 27 शतकं ठोकली आहेत. त्यातील तब्बल 25 शतकं त्यानं सलामीला येऊन केली आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं सलामीला खेळताना चार शतकं ठोकली आहेत. हा एक विश्वविक्रम आहे.

रोहित शर्माचं हे टेस्ट क्रिकेटमधलं चौथं शतक आहे. रोहितची सुरुवातीची 2 शतकं त्याच्या पहिल्या २ मॅचमध्येच आली होती. यानंतर तिसऱया शतकासाठी रोहितला 4 वर्ष वाट पाहावी लागली. 2013 साली रोहितने पहिली 2 शतकं केली तर 2017 साली रोहितला तिसरं शतक करता आलं. यानंतर 2 वर्षांनी रोहितने चौथं शतक झळकावलं.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD