“रोहित शर्माबाबत ‘हे’ खूप मोठ दुर्दैव आहे”

Thodkyaat

Thodkyaat

Author 2019-09-27 09:53:47

img

मुंबई : रोहित शर्मासारख्या कौशल्यवान फलंदाजाला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी झगडावे लागते, हे दुर्दैवी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्यालाच सलामीवीर म्हणून संधी देण्यात यावी, असे स्पष्ट मत भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने गुरुवारी व्यक्त केले.

इंडियन ऑइलतर्फे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका खास कार्यक्रमासाठी उपस्थित होता. त्यावेळी वेळी रहाणेने आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघाच्या योजनेविषयीही मत व्यक्त केले.

रोहितसारखा फलंदाज संघाबाहेर असणे, हे फारच दुर्दैवी आहे. त्याच्याकडे एकहाती सामना जिंकवून देण्याची क्षमता आहे. आफ्रिकेविरुद्धही त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. परंतु त्याला अंतिम संघात कोणती भूमिका सोपवण्यात येईल, हे सांगणे कठीण आहे. मात्र रोहितलाच सलामीला संधी मिळावी, अशी माझीही इच्छा आहे, असंही रहानेनं म्हटलं आहे.

एक-दोन वर्षांत माझी कामगिरी ढासळल्यामुळे अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असावा, परंतु मी अशा गोष्टींकडे लक्ष न देता स्वत:च्या खेळावरच लक्ष केंद्रित करण्याला प्राधान्य देतो, असं 57 कसोटींचा अनुभव गाठीशी असणाऱ्या रहाणेनं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN