.तर कदाचित मी आणखी एक विश्वचषक खेळू शकलो असतो- युवराज सिंग

Indian News

Indian News

Author 2019-09-28 11:44:45

img

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या काळात संघ व्यवस्थापनाने साथ दिली नाही, असा आरोप भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने केला आहे. संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा मिळाला असता, तर 2011 मधील शानदार प्रदर्शनानंतर आणखी एक विश्वचषक खेळलो असतो, असं युवराजने म्हटलं.

2011 मध्ये दमदार कामगिरी करुनही मला आणखी एक विश्वचषक खेळता आला नाही. संघ व्यवस्थापनाकडून मला काहीही सहकार्य मिळालं नाही, याचं मला दुःख होतं. मला जर त्याप्रकारे पाठिंबा मिळाला असता तर कदाचित मी आणखी एक विश्वचषक सामना खेळू शकलो असतो, असं युवराज सिंग सांगितलं.

मी जे काही क्रिकेट खेळले आहे ते माझ्या स्वतःच्या जोरावर खेळलो.

माझा कोणीही 'गॉडफादर' नव्हता. फिटनेससाठी अत्यावश्यक 'यो-यो टेस्ट' उत्तीर्ण करुनही माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असं युवराज म्हणाला.

संघ व्यवस्थापनाला माझ्यापासून पळण्याऐवजी माझ्या करिअरविषयी स्पष्टपणे बोलायला हवं होतं, असं युवराजने म्हटलंय.

मला 2017 च्या चॅम्पियन ट्रॉफीनंतर 8 ते 9 सामन्यात दोनदा सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्यानंतरही मला संघाबाहेर करण्यात आलं. याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी दुखापतग्रस्त झालो आणि मला श्रीलंका मालिकेची तयारी करण्यास सांगितलं गेलं, असं सांगत युवराजने संघ व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN