.म्हणून विराटला चाचा म्हणणे रिषभ पंतला पडले महागात

Indian News

Indian News

Author 2019-11-06 19:56:19

img

विराट कोहलीने काल(5 नोव्हेंबर) आपला 31 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने विराटवर आजी-माजी क्रिकेटपटूंकडून तसेच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. यामध्ये युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने विराटला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देऊन सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

पंतने कोहलीला चाचा म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतने ट्विट केले आहे की वाढदिवसाच्या शुभेच्छा चाचा. विराट कोहली, नेहमी हसत राहा.'

पंतच्या या ट्विटवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी तुझा खेळ सुधारण्यावर अधिक लक्ष केंद्रित कर, असे पंतला सुनावत ट्रोल केले आहे. तर काही चाहत्यांनी मात्र या ट्विटला विनोदी म्हटले आहे.

पंतवर मागील काही दिवसांपासून खराब कामगिरीमुळे सातत्याने टीका होत आहे.

3 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध झालेल्या पहिल्या टी -20 सामन्यात पंतला 27 धावा करण्यात यश आले होते, परंतू तो सामन्याच्या महत्त्वपूर्ण क्षणाला बाद झाला.

तसेच त्याच्याबरोबर धाव घेत असताना चांगल्या लयीत खेळणारा शिखर धवन धावबाद झाला. त्यानंतर पंतने डीआरएसचा निर्णयही चूकीचा घेतला. त्यामुळे या सामन्यानंतरही पंत मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून ट्रोल झाला होता.

या सामन्यात बांगलादेशने भारतीय संघाला 7 गडी राखून पराभूत केले. आता पुढील सामना उद्या (7 नोव्हेंबर) राजकोट येथे होणार आहे.

पंतने विराटला ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर अशा आल्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया -

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN