.. तर विराटचे निलंबन

Deshdoot

Deshdoot

Author 2019-09-26 02:21:00

img

मुंबई । टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर निलंबनाची टांगती तलवार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या टी-20 सामन्यावेळी विराटला एक डिमेरिट पॉईंट आणि ताकीद देण्यात आली. यानंतर आता विराटला आणखी एक डिमेरिट पॉईंट मिळाला तर विराटचे निलंबन होईल. तिसर्‍या टी-20वेळी 5व्या षटकामध्ये विराटने धाव काढत असताना ब्युरन हेन्ड्रिक्सच्या खांद्याला धक्का मारला.

विराटने हा गुन्हा स्वीकारला आहे, त्यामुळे याची सुनावणी घ्यायची गरज नसल्याचे आयसीसीचे सामना पंच रिची रिचर्डसन म्हणाले. 2 वर्षांमध्ये विराटचे 3 डिमेरिट पॉईंट झाले आहेत.

विराट कोहलीला 15 जानेवारी 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेन्च्युरियन टेस्टवेळी पहिला डिमेरिट पॉईंट मिळाला. मैदानात अंपायरची गैरवर्तणूक केल्यामुळे विराटवर ही कारवाई झाली होती. यानंतर विश्वचषकामध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त अपील केल्यामुळे विराटला दुसरा डिमेरिट पॉईंट मिळाला. खेळाडूला 2 वर्षांत 4 डिमेरिट पॉईंट मिळाले, तर त्याचे निलंबन करण्यात येते. त्यामुळे विराटला 16 जानेवारी 2020 पर्यंत आणखी एक डिमेरिट पॉईंट मिळाला, तर त्याला मैदानाबाहेर राहावे लागेल.

4 डिमेरिट पॉईंट झाल्यानंतर खेळाडूला एक कसोटी किंवा 2 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामना, यापैकी जे पहिले असेल त्याला मुकावे लागते. या वर्षामध्ये भारत मोठा कालावधी क्रिकेट खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज, यानंतर नोव्हेंबरमध्ये बांगलादेश भारत दौर्‍यावर 3 टी-20 आणि 2 कसोटी सामने खेळेल. यानंतर वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धही भारत सीरिज खेळणार आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN