...तरच आशियाई कपमध्ये होणार भारत-पाक सामना, BCCIने घातली अट

News18

News18

Author 2019-10-09 18:10:00

img

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : आशियाई चषक 2020चे यजमानपद पाकिस्तानकडे देण्यात आले आहे. मात्र यात बीसीसीआयनं खोडा घातला आहे, कारण पाकिस्तानमध्ये आशियाई चषक झाल्यास भारतीय संघ त्यात सामिल होणार नाही. त्यामुळं आता पाकिस्तानमध्ये आशियाई चषक होणार की नाही, याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषद घेणार आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डानं या स्पर्धेत सामिल होण्यासाठी तयारी दर्शवली नाही आहे, कारण याचे यजमानपद हे पाकिस्तानकडे असणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातीस तणावामुळं दोन्ही देशातील मालिका बंद करण्यात आल्या होत्या. दोन्ही देश फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये सामने खेळले आहेत. 26/11नंतर भारत-पाकमध्ये एकही सामना झालेला नाही. त्यामुळं जर पाकिस्तानला यजमानपद स्वत: जवळ ठेवायचे असेल तर भारत या स्पर्धेत सामिल होणार नाही, त्यामुळं बीसीसीआयनं पाकची कोंडी केली आहे.

दरम्यान, आगामी आशिया चषक स्पर्धा टी-२० प्रकारात खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियात सप्टेंबर २०२० मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपआधी या स्पर्धेचे आयोजन केलं जाणार आहे. तसेच, जर ही स्पर्धा भारतात झाली नाही तर सुरक्षेच्या कारणास्तव संयुक्त अरब अमीरातीमध्ये ही स्पर्धा होईल, असे बोलले जात आहे.

वाचा-‘रोहितबाबत मला काही विचारू नका’, पत्रकार परिषेदत एका प्रश्नावरून भडकला विराट

जून 2020पर्यंत पीसीबीला घ्यायचा आहे निर्णय

एनआयने दिलेल्या वृत्तात, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला जून 2020पर्यंत आशियाई चषकाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. या संदर्भात पीसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीत, “जून 2020पर्यंत बीसीसीआयच्या निर्णयाची वाट पाहणार आहोत. यानंतर पाकिस्तानमध्ये आशियाई चषक होणार की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. सामने कुठे होतील याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही”, असे सांगितले.

वाचा-टेस्ट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अव्वल, तरी ICCवर बरसला कॅप्टन कोहली

आशियाई क्रिकेट परिषद घेणार अंतिम निर्णय

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीत, “जर भारतानं कोणता निर्णय घेतला तर त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषद अंतिम निर्णय घेणार आहे. गेल्या वर्षी भारतात आशियाई कर होणार होता, मात्र शेवटच्या क्षणी दुबईमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळं आताही आशियाई क्रिकेट परिषदेनंतर निर्णय घेतल्यानंतर काय होणार हे ठरवण्यात येईल.

वाचा-टी-20 वर्ल्ड कपआधी धोक्याची घंटा, हुकुमी खेळाडूंची दुखापत संघासाठी डोकेदुखी

VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD