AUSvsPAK : कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात बाबर आझमचा थयथयाट

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-11-06 14:53:31

img

कैनबरा : स्टिव्ह स्मिथच्या नाबाद 80 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात सात गडी राखून विजय मिळवला. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने या सामन्यावर सगळ्यांचे लक्ष लागले होते. पाकिस्तानचा कर्णधार म्हणून बाबर आझमचा हा पहिलाच सामना होता. मात्र, तो नको त्या कारणांमुळे आता चर्चेत राहिला आहे. 

कर्णधार म्हणून पहिला सामना खेळणाऱ्या बाबरला अशा पराभवाची अपेक्षा नव्हती. त्याच्या संघाची दुरावस्था जणू त्याला सामन्याच्या सुरवातीला दिसायला लागली होती आणि यामुळे निराश झालेल्या त्याचा मैदानातच संयम सुटला आणि त्याने मैदानावरच नाराजी व्यक्त केली. त्याचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. 

img

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतली मात्र, पॉवर प्लेमध्येच संघाची अवस्था बघून बाबर हैराण झाला. बाबर एका बाजूने खेळत होता तर दुसरीकडे मात्र, सगळे फलंदाज समोरुन बाद होत गेले. असिफ अली फलंदाजीला आला. असिफ 12व्या षटकात ऍश्टन एगरच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. 

असिफचा हा शॉट इतका खराब होता की समोर उभ्या असलेल्या बाबरला राग अनावर झाला. मात्र, त्यानंतर खरा सीन झाला. बाबरने असिफ बाद होण्याच्या एक चेंडू आधी लाँग ऑनवर शॉट मारला. त्यावेली त्याला दोन धावा अपेक्षित होत्या. मात्र, असिफने दुसरी धाव घेण्यास नकार दिला. त्यामुळे राग अनावर झालेल्या बाबरने मैदानातच थयथयाट केला. 

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला 50 षटकांत जेमतेम दीडशेची मजल मारता आली. कर्णधार बाबर आझमच्या (50) अर्धशतकानंतर अखेरच्या टप्प्यात इफ्तिकार अहमदने दिलेल्या तडाख्यामुळे पाकिस्तानला हे आव्हान गाठता आले. इफ्तिकारने 34 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांच्या सहाय्याने 62 धावा केल्या. 

आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने वेगवान सुरवातीनंतर वॉर्नर आणि फिंच या दोन्ही आक्रमक फलंदाजांना गमावले. पाकिस्तानला यामुळे वर्चस्व राखण्याची संधी होती. मात्र, त्यांच्या गोलंदाजांना स्मिथवर अंकुश ठेवता आला नाही. त्याने मॅकडरमॉटला साथीला घेत ऑस्ट्रेलियाचा विजय निश्‍चित केला. 

विजयासाठी 45 धावांची गरज असातना मॅकडरमॉट बाद झाला. त्यानंतर स्मिथने एकाहाती ऑस्ट्रेलियाला विजयी केले. स्मिथच्या साथीत नाबाद राहिलेल्या ऍशले टर्नरच्या या 45 धावांच्या भागीदारीत केवळ 8 धावांचा वाटा होता. पाकिस्तानकडून इमाद वसिम, महंमद इरफान आणि महंमद अमिर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 

(Image Source - Crictracker.com)

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD