BCCIचा अध्यक्ष होण्याआधीच गांगुलीला बसला 7 कोटींचा फटका!

Indian News

Indian News

Author 2019-10-15 17:34:00

img

मुंबई, 15 ऑक्टोबर : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोधात निवड झाली आहे. 23 ऑक्टोबरला होणाऱ्या बीसीसीआयच्या निवडणुकीत सर्व सदस्य आपला पदभार स्विकारतील. दरम्यान अध्यक्षपदी विराजमान होण्याआधीच गांगुलीला कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.

भारतीय संघात अमुलाग्र बदल करणाऱ्या आणि भारताच्या क्रिकेटला वेगळीच दिशा देणारा कर्णधार म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. गांगुलीकडे असलेल्या नेतृत्वगुण, संघातील खेळाडूंच्या पाठिशी नेहमीच उभा राहणं आणि नव्या खेळाडूंना संधी देण्याची कामगिरी त्यानं केली. सोमवारी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी तर जय शाह यांची सचिवपदी निवड झाली आहे, अशी घोषणा केली.

या सगळ्या पदांचा कार्यकाळ 10 महिने असणार आहे.

भारताच्या क्रिकेटमध्ये आजही का चालते गांगुलीचा 'दादा'गिरी, जाणून घ्या कारण

मात्र अध्यक्षपद स्वीकारल्यामुळं गांगुलीला जवळ जवळ 7 कोटींचे नुकसान होणार आहे. अध्यक्षपदासाठी गांगुलीचा कार्यकाळ 10 महिने असल्यामुळं सप्टेंबर 2020नंतर त्याला कुलिंग ऑफ पिरेडवर जावे लागणार आहे.

दरम्यान, 47 वर्षीय गांगुली सध्या समालोचन आणि जाहिराती करत असतो. मात्र बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्याला इतर कामे करण्याची परवानगी नसणार आहे. त्याचबरोबर गांगुलीला कोणत्याही माध्यमांशी कसलेही करार करता येणार नाहीत. एवढेच नाही तर बीसीसीआयचा अध्यक्ष होण्यासाठी गांगुलीला बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्याशिवाय गांगुली दिल्ली कॅपिटल्स संघाशीही जोडला गेला आहे.

'अब अंडरग्राऊंड होने का समय है'! गांगुली अध्यक्ष झाल्यावर नेटकऱ्यांचा धुमाकूळ

10 महिन्यासांठी झाली निवड

मैदानात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेला 47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशन(CAB)चा अध्यक्ष आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीचं नाव जवळपास निश्चित झालं असलं तरी तो फक्त 10 महिनेच या पदावर राहू शकतो. त्यामुळे तो सप्टेंबर 2020पर्यंत या पदावर राहू शकेल. याचबरोबर जय शहा आणि अरुण सिह धुमल यांचीही 10 महिन्यांसाठी निवड झाली आहे.

भारताचा माजी कर्णधार भाजपमध्ये प्रवेश करणार? अमित शहा म्हणाले...

आजही भारतीय क्रिकेटमध्ये गांगुलीची दादागिरी

सौरव गांगुलीने फलंदाजीत तर विक्रम केलेच पण कर्णधार म्हणून त्यानं जगभरात नाव कमावलं. भारतीय संघाच्या पडत्या काळात गांगुलीने नेतृत्व केलं आणि संघाला पुन्हा उभा केलं. खेळाडूंना प्रोत्साहन देताना नेहमीच त्यांना पाठिंबा दिला. गांगुलीने टाकलेला विश्वास खेळाडूंनीही सार्थ ठरवला. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना संघात आत्मविश्वास निर्माण झाला. गांगुलीच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गज खेळाडू तयार झाले. यामध्ये युवराज सिंग, जहीर खान, महेंद्रसिंग धोनी, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग यांचा समावेश आहे. यांच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात गांगुलीच्या नेतृत्वाखाली झाली. याशिवाय अजित आगरकर, आशिष नेहराने गांगुलीच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कामगिरी केली.

सौरव गांगुलीची BCCIच्या अध्यक्षपदी निवड, अमित शहांच्या मुलाची सचिवपदी नियुक्ती

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN