BCCIची एक चूक आणि भुवनेश्वरचे आख्खं करिेअर धोक्यात!

Beta1 Esakal

Beta1 Esakal

Author 2019-10-31 12:35:48

imgनवी दिल्ली : भारतीय संघ विश्वकरंडकानंतर सातत्याने क्रिकेट खेळत आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध शानदार विजय मिळविल्यानंतर भारतीय संघ आता बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. मात्र, सातत्याच्या क्रिकेटमुळे खेळाडूंच्या फिटनेस नक्कीच परिणाम होताना दिसत आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा दुखापतग्रस्त असताना दुसरा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार नक्की कुठे गायब आहे असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. 

रहाणेने रोहितला दिले अस्सल मराठीत उत्तर, बघा काय होता प्रश्न

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भुवीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात जस्पित बुमराला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. त्याच्याजागी भुवीला संघात स्थान न देता उमेश यादवला स्थान देण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेतही त्याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यातच तो सध्या कुठे आहे, याबाबात बीसीसीआयही काही सांगण्यास तयार नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीमुसार भुवी सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीमध्ये आपल्या तंदुरुस्तीवर काम करत आहे. 

img

भुवी गेले दोन-तीन महिने क्रिकेटपासून दूर आहे. तो अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. बरेच दिवस क्रिकेटपासून दूर असलेल्या भुवीवर राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी नक्की काय उपचार करत आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. 

गांगुलींचे खेळाडूंना दिवाळी गिफ्ट; मिळणार बक्कळ मानधन

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार भुवी 2018पासून दुखापतग्रस्त आहे. त्यानंतर तो विश्वकरंडकही खेळला. मात्र, आता एनसीएमध्ये त्याच्यावर नीट उपचार केले जात नसल्याने त्याला क्रिकेटपासून लांब रहावे लागत असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 

img

विश्वकरंडकातही होता जखमी 
भुवनेश्वर कुमारला विश्नकरंडकात स्थान देण्यात आले होते. त्याआधीच तो दुखापतग्रस्त होता तरी त्याला खेळविण्यात आले. त्याला जुलै 2018पासून स्नायूदुखीचा त्रास होत आहे. विश्वकरंडकात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याचा त्रास दिसूनही आला मात्र तो तसाच खेळत राहिला. 

बुमरासारखे उपचार भुवीला का नाही?
भारतीय संघातील बुमरा आणि हार्दिक पंड्या हे दोघेही दुखापतग्रस्त आहेत. बुमरा आणि पंड्या दोघांनाही उपचारासाठी इंग्लंडला पाठविण्यात आले होते. मग भुवीच्या उपचारात एवढा निष्काळजीपणा का केला जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीसीसीआय ज्याप्रमाणे पंड्या आणि बुमराच्या तंदुरुस्तीबद्दल बोलत आहे त्याप्रमाणे त्यांनी कधीच भुवीबद्दल खुलासा केलेला नाही. त्यामुळे बीसीसीआच्या निष्काळजीपणामुळे भुवीचे करिअर धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN