Happy Birthday Virat Kohli: रेकॉर्ड आणि रन मशीन आज 31 वर्षांचा झाला

TIMES NOW

TIMES NOW

Author 2019-11-05 10:54:30

img

Virat Kohli celebrates his 31st birthday today - November 05, 2019: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विराट कोहली आज आपला 31 वा बर्थडे साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटचा पोस्टर बॉय सतत फॅन्सचं भरपूर मनोरंजन करत आहे. तसंच एकापाठोपाठ एक बॅटिंगचे रेकॉर्ड्स मोडण्याचा विक्रम स्थापित करत आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली जेव्हा मैदानावर खेळण्यासाठी उतरतो तेव्हा रेकॉर्ड त्याच्या निशाण्यावरच असतो.

विराट कोहलीला केवळ टीम इंडियाची रन मशीन नाही तर रेकॉर्ड मशीन देखील म्हटलं जातं. वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वांत वेगानं 10 हजार वनडे रन बनवणारा कोहली क्रिकेटप्रमाणे आपल्या पर्सनल लाइफमध्ये ही रॉकस्टार आहे. कोहलीला जेव्हा ही ब्रेक मिळतो तेव्हा तो आपल्या कुटुंबियासोबत वेळ घालवणं पसंत करतो. भारत आणि बांग्लादेश यांच्यात सध्या तीन सामन्याची T20 आंतरराष्ट्रीय सामन्याची सीरिज खेळली जात आहे. ज्यातून कोहलीनं ब्रेक घेतला आहे. माहिती मिळाली आहे की, कॅप्टन कोहली आपली पत्नी बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मासोबत सध्या भूतानमध्ये आहे आणि तिथे तो आपला बर्थडे सेलिब्रेट करत आहेत.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD