HBD VIRAT : वाढदिवशीच विराटने लिहिले स्वत:लाच ‘प्रेरणादायी’ पत्र

Dainik Prabhat

Dainik Prabhat

Author 2019-10-26 11:34:00

img

नवी दिल्ली – टीम इंडियाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचा आज ३१ वा वाढदिवस आहे. विराट कोहलीने आत्तापर्यंत यशस्वी कामगिरी केली आहे. त्याच्या अफलातून खेळीमुळे भारतीयांच्या मनामनात त्याने स्थान मिळवले आहे. भारतातूनच नाही तर जगभरातून विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाढदिवसाच्या दिवशी आज विराटने स्वतःलाच म्हणजे कुमार वयातील चीकूला एक प्रेरणादायी पत्र लिहले आहे. हे पत्र त्याने ट्विट केेले आहे.

या खास पत्रामध्ये विराटने त्याचा १५ वर्षांच्या जीवनाचा प्रवास सांगितला आहे. त्याबरोबरच त्याने हाताने लिहलेले एक पत्रही पोस्ट केले आहे. तू स्वप्नांचा पाठलाग कर, चांगल्या संधी तुझ्या जीवनात येतील, त्यांच्यासाठी कायम तयार रहा, जीवनाचा प्रवास रोमांचकारी असून प्रत्येक अपयश आणि संधीमधून तुला शिकायला मिळेल. कुटुंबावर प्रेम करत रहा. उंच झेप घेण्याचे स्वतःला आश्वासन दे, त्यासाठी कायम प्रयत्न करत रहा, असे पत्रात लिहले आहे.

विराटचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा झाला. चीकू हे विराटचे टोपणनाव आहे. रणजी सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने भारतीय सघांत विराटला संधी मिळाली. त्यानंतर विराटने मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक सामन्यामध्ये त्याचा खेळ सुधारतच गेला. कसोटी सामन्यांमध्ये भारताकडून खेळताना सर्वांत जास्त द्विशतकं करण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. तर कसोटीत त्याने ७ हजार धावा पूर्ण केल्या. तर एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ११ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराटने केला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN