Ind vs Ban 1st T20I: 'हिटमॅन'नं टाकलं विराट, धोनीला मागे

TIMES NOW

TIMES NOW

Author 2019-11-03 21:25:58

img

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये पहिला टी 20 सामना सुरू आहे. या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा बदली कॅप्टन रोहित शर्मा अवघ्या 9 धावा करून बाद झाला. पण या नऊ धावांसह त्यानं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये मोठा टप्पा गाठला आहे. या सामन्यात रोहितनं माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याचसोबत त्यानं कॅप्टन विराट कोहलीलाही मागं टाकलं आहे.

रोहित शर्मा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हाच त्यानं धोनीला मागं टाकलं. आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळण्याच्या बाबतीत धोनीला, तर सर्वाधिक धावांच्या बाबतीत विराटला मागे टाकलं. रोहित शर्माचा हा 99 वा T20 सामना आहे. या आधी भारताकडून पुरूष क्रिकेट टीममध्ये धोनीनं सर्वाधिक 98 आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामने खेळले होते. धोनीचा तोच विक्रम रोहितनं मोडला आहे.

टीम इंडियातील सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामने

  • 99 रोहित शर्मा *
  • 98 एमएस धोनी
  • 78 सुरेश रैना
  • 72 विराट कोहली
  • 58 युवराज सिंग

रोहित शर्माच्या नावावर भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळण्याचा विक्रम झाला आहे.

शोएब मलिक आणि शाहिद आफ्रिदी आघाडीवर

2007 साली वर्ल्ड T20 मध्ये इंग्लंडविरूद्ध आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रोहित या यादीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा शोएब मलिक 111 सामन्यांसह पहिल्या, तर शाहिद आफ्रिदी 99 सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहलीचाही रेकॉर्ड ब्रेक

जरी बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात अवघ्या सहा बॉलमध्ये 9 धावा करून रोहितनं विराट कोहलीचाही रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत त्यानं विराटला मागे टाकलं आहे. विराटनं 72 सामन्यामध्ये 2450 धावा केल्या. तर रोहितनं 99 सामन्यांध्ये 2452 धावा केल्यात. विराटच्या नावावर 22 हाफ सेन्चुरी तर रोहितच्या आतापर्यंत 4 सेन्चुरी आणि 17 अर्धशतक आहेत.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD