IND vs BNG: टी-२० सामन्यात बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

Mumbailive

Mumbailive

Author 2019-11-25 18:54:17

img

भारता विरूद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेशनं विजय मिळवला आहे. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत बांगलादेश संघासमोर १४९ धावांत आव्हान ठेवलं होतं. या आव्हान बांगलादेशनं मुश्फिकुर रहीमच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुर्ण केलं. या विजयासह बांगलादेशने भारताविरूद्ध टी २० इतिहासातील पहिला सामना जिंकला.

क्रिकेटप्रेमींचं लक्ष

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला. या आधीच्या ८ सामन्यात भारतानं बांगलादेशला धूळ चारली. या मालिकेतील दुसरा सामना गुरूवारी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ जिंकणार का याकडं आता सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

राहुल स्वस्तात माघारी

प्रथम फलंदाजी करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. पहिल्या षटकाच्या पहिल्या ५ चेंडूत रोहितनं दोन चौकार मारले. मात्र अखेरच्या चेंडूवर तो पायचीत झाला. त्यानं ५ चेंडूत केवळ ९ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला लोकेश राहुल देखील स्वस्तात माघारी परतला. चेंडूचा अंदाज न आल्यानं त्यानं मारलेला फटका थेट फिल्डरच्या हातात गेला आणि तो झेलबाद झाला. राहुलनं १७ चेंडूत १५ धावा केल्या.

पदार्पणाचा सामना

या सामन्यात शिखर धवन आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी होत असतानाच मैदानात त्या दोघांमध्ये धाव घेण्यावरून गोंधळ झाला. त्यामुळं शिखर धवनला धावबाद व्हावं लागलं. धवननं ३ चौकार आणि १ षटकार लगावत ४२ चेंडूत ४१ धावा केल्या. त्याशिवाय, भारतीय संघातून आपला पदार्पणाचा टी-२० सामना खेळणारा मुंबईकर शिवम दुबे केवळ एक धाव करून बाद झाला.

हेही वाचा -

भारतीय संघात मुंबईच्या 'या' खेळाडूला संधी

पावसामुळं ५० ते ७० टक्के भाज्या कुजल्या

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD