Ind vs SA : 'सर जाडेजा' भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत

Loksatta

Loksatta

Author 2019-10-04 18:40:33

img

विशाखापट्टणम कसोटीत दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाच्या खेळात भारताला चांगलच झुंजवलं आहे. ५०२ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली, मात्र सलामीवीर डीन एल्गरच्या शतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने फॉलोऑनची नामुष्की टाळली. एल्गरने १६० धावांची खेळी करत आफ्रिकेची बाजू भक्कम करण्यात महत्वाचा वाटा उचलला. त्याला कर्णधार फाफ डु-प्लेसिस आणि क्विंटन डी-कॉकने चांगली साथ दिली. अखेरीस रविंद्र जाडेजाने एल्गरला बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत आपलं स्थान मिळवलं आहे. डावखुऱ्या गोलंदाजांच्या यादीत सर्वात जलद २०० बळींचा टप्पा गाठणारा जाडेजा पहिला गोलंदाज ठरला आहे.

डीन एल्गर हा रविंद्र जाडेजाचा कसोटी क्रिकेटमधला २०० वा बळी ठरला आहे. आतापर्यंत फक्त १० भारतीय गोलंदाजांनाच ही कामगिरी करता आलेली आहे. रविंद्र जाडेजाने आपल्या ४४ व्या कसोटीमध्ये २०० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. या यादीमध्ये रविंद्र जाडेजा इतर गोलंदाजांच्या मागे असला तरीही त्याने कमी कसोटींमध्ये हा पल्ला गाठल्यामुळे आगामी काळात तो अनेक दिग्गजांना मागे टाकू शकतो.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे भारताचे १० गोलंदाज –

  • अनिल कुंबळे – ६१९ बळी
  • कपिल देव – ४३४ बळी
  • हरभजन सिंह – ४१७ बळी
  • रविचंद्रन आश्विन – ३४५ बळी
  • झहीर खान – ३११ बळी
  • इशांत शर्मा – २७९ बळी
  • बिशनसिंह बेदी – २६६ बळी
  • जवागल श्रीनाथ – २३६ बळी
  • रविंद्र जाडेजा – २०० बळी*

दक्षिण आफ्रिकेने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत फॉलोऑनचा धोका टाळला आहे. त्यामुळे पहिली कसोटी अनिर्णित राहण्याची दाट शक्यता आहे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD