Ind vs SA : 'सिक्सर किंग' रोहितचं हे शतक ठरलंय खास, जाणून घ्या कारण...

Loksatta

Loksatta

Author 2019-10-19 16:49:22

img

अजिंक्य रहाणेच्या सोबतीने झळकावलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर रोहित शर्माने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा डाव सावरला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत रोहित शर्माने रांची कसोटीतही शतक झळकावलं. या मालिकेतलं रोहितचं हे तिसरं शतक ठरलं. विशाखापट्टणम कसोटीत दोन्ही डावांमध्ये रोहित शर्माने शतकी खेळी केली होती.

भारताचे सुरुवातीचे ३ फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर रोहितने खेळपट्टीवर पाय रोवून चौफेर फटकेबाजी केली. पिडीटच्या गोलंदाजीवर षटकार खेचत रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतलं सहावं शतक झळकावलं. कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांच्या सहाय्याने आपलं शतक पूर्ण करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माने गौतम गंभीरशी बरोबरी केली आहे. या यादीमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे.

या शतकी खेळीसह रोहित शर्मा एका कसोटी मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा जास्त शतकी खेळी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी माजी फलंदाज सुनिल गावसकर यांनी अशी कामगिरी केली होती.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD