Ind vs SA : अजिंक्य रहाणेचं शतक, गांगुली-लक्ष्मणला टाकलं मागे

Loksatta

Loksatta

Author 2019-10-20 13:05:13

img

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत, प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. पहिल्या दिवशी रोहित शर्माने शतकी खेळी केल्यानंतर, त्याचा साथीदार अजिंक्य रहाणेनेही आपलं शतक झळकावलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेचं हे अकरावं शतक ठरलं. तब्बल ३ वर्ष आणि १६ कसोटी सामन्यांनंतर अजिंक्य रहाणेने घरच्या मैदानावर खेळताना शतक झळकावलं आहे. भारतीय मैदानावरचं अजिंक्यचं हे चौथ शतक ठरलंय.

या शतकी खेळीदरम्यान अजिंक्य रहाणेने सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यासारख्या दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अजिंक्य दुसऱ्या स्थानी पोहचला आहे.

कसोटीत पाचव्या क्रमांकावर सर्वाधिक शतकं झळकावणारे भारतीय फलंदाज –

  • मोहम्मद अझरुद्दीन – १६ शतकं
  • अजिंक्य रहाणे – ८ शतकं *
  • पॉली उम्रीगर – ८ शतकं
  • सौरव गांगुली – ६ शतकं
  • व्ही.व्ही.एस.लक्ष्मण – ६ शतकं

दरम्यान चौथ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणेने रोहित शर्मासोबत द्विशतकी भागीदारी रचत भारताची बाजू आणखीन मजबूत केली.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD