IND vs SA: आज रंगणार तिसरा T20 सामना, कधी आणि कुठे असेल सामना जाणून घ्या

TIMES NOW

TIMES NOW

Author 2019-09-22 11:59:12

img

बंगळुरूः कॅप्टन विराट कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया रविवारी तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये सामना खेळला जाणार आहे. धरमशालामध्ये पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता आणि दुसऱ्या सामन्यात बॉलर्सचं शानदार प्रदर्शन आणि कोहलीचा चांगला खेळ यामुळे भारतानं सात विकेट्सनी विजय मिळवला आणि 1-0 अशी आगेकुच केली. त्यामुळे 2-0 अशी आघाडी मिळवण्याच्या दृष्टीनं टीम इंडिया आज मैदानात उतरेल आणि सीरिज जिंकण्यासाठी प्रयत्न करेल.

रिषभ पंतबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. बॅटिंगमध्ये रिषभला आणखीन संघर्ष करावा लागणार आहे. मात्र त्याच्या कामगिरीवर बारिक लक्ष ठेवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये बरेच खेळाडू उपस्थित आहेत. जे गेल्या सामन्यात स्थानिक टीमच्या खेळाडूंना थांबवण्यात असमर्थ ठरले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं दणदणीत विजय मिळवत 3 सामन्यांच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी मिळवली. या सामनाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली. कोहलीच्या धडाकेबाज बॅटिंगच्या जोरावरच टीम इंडियानं हा सामना सहा बॉल आणि ७ प्लेअर्स राखून जिंकला. यावेळी विराटनं अवघ्या 52 बॉलमध्ये 72 रन्सची तुफानी बॅटिंग केली. यावेळी विराटनं 4 फोर आणि 2 सिक्सही ठोकले. यावेळी पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमनं 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून फक्त 149 धावाच केल्या. तर भारतानं आफ्रिकेचं हे आव्हान १९ ओव्हरमध्येच पूर्ण केलं.

अशा प्रकारे असेल टीम

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा (व्हाइस-कॅप्टन), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, क्रृणाल पंड्या, वाशिंगटन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (कॅप्टन), रासी वैन डर दुसेन (व्हाइस-कॅप्टन), टेम्बा बावुमा, जूनियर डाला, ब्योर्न फोर्टुइन, बेयुरान हेंड्रिक्स, रीजा हेंड्रिक्स, डेविड मिलर, एनरिक नाट्रजे, एंडिले फेलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, जॉन-जॉन स्मट्स.

आजचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे.

img

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN