IND vs SA : एल्गरने संपवला आफ्रिकेचा ९ वर्षांचा दुष्काळ

Loksatta

Loksatta

Author 2019-10-04 18:44:48

img

सलामीवीर डीन एल्गरने केलेले संयमी दीडशतक आणि त्याला आधी कर्णधार फाफ डु प्लेसिस, नंतर क्विंटन डी कॉकने दिलेली साथ याच्या जोरावर आफ्रिकेने चहापानापर्यंत ५ बाद २९२ धावा केल्या. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात आफ्रिकेने ४ गडी गमावत १५३ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर डु प्लेसिस आणि डी कॉकने एल्गरला चांगली साथ दिली. याचसोबत डीन एल्गरने एक विक्रम केला.

डीन एल्गरने १६० धावांची दमदार खेळी केली. त्यासाठी त्याने २८७ चेंडू खेळले. या खेळीत त्याने १८ चौकार आणि ४ षटकार खेचले. याचसोबत तब्बल ९ वर्षानंतर आफ्रिकेला भारतात कसोटी शतक झळकावणारा फलंदाज मिळाला. या आधी हाशिम अमला याने २०१० साली भारतात झालेल्या कसोटी सामन्यात शतक लगावले होते. त्यानंतर ९ वर्षात एकाही आफ्रिकन गोलंदाजाला भारतात शतक झळकावणे शक्य झाले नव्हते. पण डीन एल्गरने मात्र हा दुष्काळ संपवला.

दरम्यान, दुसऱ्या दिवसाअखेरीस आफ्रिकेचे ३ गडी अवघ्या ३९ धावांमध्ये माघारी परतले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आफ्रिकेच्या खेळाडूंनी डावाची संयमी सुरुवात केली. आफ्रिकेची जोडी मैदानावर स्थिरावते असं वाटत असतानाच इशांत शर्माने बावुमाला आपल्या जाळ्यात अडकवलं. यानंतर मैदानात आलेल्या फाफ डु प्लेसिसने एल्गरच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत आफ्रिकेला शतकी धावसंख्या ओलांडून दिली. पण अश्विनने त्याला ५५ धावांवर माघारी धाडले.

डु प्लेसिस माघारी परतल्यानंतर डी कॉकने एल्गरला चांगली साथ दिली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. चहापानापर्यंत एल्गरने आपले शतक पूर्ण केले, तर डी कॉकने अर्धशतक झळकावले आणि आफ्रिकेचा डाव सावरला. पण नंतर दीडशतक ठोकून एल्गर माघारी परतला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN