Ind vs SA : ऐतिहासिक कसोटीत विराटचा 'Super 30' क्लबमध्ये समावेश

Loksatta

Loksatta

Author 2019-10-13 17:54:00

img

भारतीय संघाने पुण्याच्या गहुंजे मैदानावर दक्षिण आफ्रिकेवर १ डाव आणि १३७ धावांनी मात करत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग ११ वा मालिका विजय ठरला आहे. याआधी कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाहीये. कर्णधार विराट कोहलीसाठीही हा सामना अतिशय महत्वाचा ठरला आहे.

कर्णधार या नात्याने विराट कोहलीसाचा हा ५० वा सामना होता. याच सामन्यात विराटने पहिल्या डावात नाबाद द्विशतकी खेळी करताना २५४ धावा केल्या. याचसोबत विजयानंतर विराटचा Super 30 क्लबमध्ये समावेश झाला आहे. कर्णधार या नात्याने पहिल्या ५० कसोटी सामन्यात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्यांच्या यादीत विराट आता तिसऱ्या स्थानी आहे. विराटचा कर्णधार म्हणून हा ३० वा विजय ठरला आहे.

या मालिका विजयामुळे भारताचं आयसीसी कसोटी क्रमवारीतलं पहिलं स्थान अधिक भक्कम होणार आहे. या मालिकेतला अखेरचा सामना १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : दक्षिण आफ्रिकेवर लाजिरवाणा प्रसंग, १० वर्षांत पहिल्यांदाच घडली अशी घटना

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN