IND vs SA कसोटी सामना : भारताने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा

Indian News

Indian News

Author 2019-10-02 13:19:09

img

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ३८ षटकांत ११६ धावा केल्या आहेत. यात रोहित-मयांकच्या जोडीने भारताने शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडलाय.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. विशाखापट्टणमच्या एसीए-व्हीडीसीए मैदानावरील पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मर्यादित षटकांच्या संघातील सलामीवीर रोहित शर्माला यंदा कसोटी संघात स्थान देण्यात आले असून फलंदाजीसाठी रोहित शर्मा-मयांक अगरवाल या जोडीने मैदानात पाऊल ठेवताच एक अनोखा विक्रम त्यांच्या नावे जमा झाला आहे.

तब्बल ४७ वर्षांनंतर दोन नवीन सलामीवीरांनी भारतामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय डावाची सुरुवात केली आहे. ४७ वर्षांपूर्वी सुनील गावसकर आणि रामनाथ पारकर या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय डावाची सुरुवात करून दिली होती. भारताचा दुसरा सलामीवीर लोकेश राहुलला त्याच्या खराब कामगिरीमुळे आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं होतं. मयांकने आतापर्यंत भारताकडून ४ कसोटी सामने खेळले आहेत, ते चारही सामने भारताबाहेर खेळले आहेत. भारतीय मैदानावर मयांकचा हा पहिलाच सामना असणार आहे.

भारताच्या ३८ षटकांत नाबाद ११६ धावा

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN