IND vs SA : चाहत्याच्या अतिउत्साहामुळे मैदानावर धडपडला रोहित...

Loksatta

Loksatta

Author 2019-10-12 19:00:50

img

भारत आणि आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ६०१ धावांचा डोंगर रचला. या धावसंख्येला उत्तर देताना आफ्रिकेची सुरूवात वाईट झाली. डीन एल्गर, एडन मार्क्रम, थेनीस डी ब्रुन, टेम्बा बावुमा, एनरिच नॉर्जे, क्विंटन डी कॉक, सेनुरन मुथुसामी यांसारखे फलंदाज धावसंख्येची चाळीशीही पार न करता माघारी परतले. केवळ कर्णधार फाफ डु प्लेसिस याने अर्धशतकी (६४) खेळी केली. त्यानंतर केशव महाराज आणि वर्नन फिलंडर यांनी चांगली झुंज दिला म्हणून आफ्रिकेला २५० पार मजल मारता आली.

सामन्यात आफ्रिकेच्या खेळाडूंच्या वाट्याला फारसे हसण्याचे क्षण आले नाहीत, पण तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी मैदानावर एका गोष्टीमुळे आफ्रिकेचे खेळाडूही हसू आवरू शकले नाहीत. सेनुरन मुथुसामी बाद झाल्यानंतर ज्या वेळी वर्नन फिलंडर मैदानावर येत होता त्यावेळी एक चाहता सुरक्षा कडे चुकवून थेट मैदानात घुसला आणि त्याने स्लिपमध्ये उभा असलेल्या रोहित शर्माच्या पायावर लोटांगण घातले. पण चाहता इतका अतिउत्साही निघाला की त्याच्या या उत्साहाचा फटका रोहितला बसला. चाहता रोहितचे पाय पकडत असताना रोहितचा तोल गेला अन् रोहित मैदानावरच धडपडला.

img

मैदानात हा प्रकार घडल्यानंतर सुरक्षारक्षक मैदानात आले आणि त्याने त्या चाहत्याला पकडून बाहेर नेले. पण हा प्रकार इतका मजेदार होता की त्यावेळी रोहितच्या शेजारी उभा असलेला अजिंक्य रहाणेदेखील आपले हसू आवरू शकला नाही.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN