IND vs SA : ट्विट ICC चं अन् रवी शास्त्री झाले ट्रोल..

Loksatta

Loksatta

Author 2019-10-14 19:01:21

img

भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या गहुंजे मैदानावर ऐतिहासिक कामगिरीची नोंदवली. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि १३७ धावांनी मात केली. फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. त्यामुळे संपूर्ण टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पण या दरम्यान, ICC च्या एका ट्विटमुळे टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री उगाच ट्रोल झाले.

ICC ने रवी शास्त्री यांचा एक फोटो ट्विट केला आणि त्या फोटोला कॅप्शन द्या असं क्रिकेटप्रेमींना सांगितले. त्यानंतर फोटोला कॅप्शन देण्याऐवजी क्रिकेटरसिकांनी त्याची मिम्स तयार करत रवी शास्त्री यांना तुफान ट्रोल केले.

ICC ने ट्विट केलेला फोटो –

या फोटोवर कमेंट येण्याऐवजी क्रिकेटप्रेमींनी शास्त्रींचा फोटो वापरून मिम्स तयार केले. त्यामुळे रवी शास्त्री प्रचंड ट्रोल करण्यात आले.

दरम्यान, या आधीही रवी शास्त्री यांना अशा प्रकारच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. विंडिज दौऱ्यावर असताना रवी शास्त्री यांनी स्वत: एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोवरूनही शास्त्री ट्रोल झाले होते.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN