Ind vs SA : पहिल्याच प्रयत्नात रोहित-मयांकची जोडी यशस्वी !

Loksatta

Loksatta

Author 2019-10-02 18:31:33

img

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आक्रमक सुरुवात केली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाअखेरीस बिनबाद २०२ धावांपर्यंत मजल मारली आहे. अंधुक प्रकाश आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे चहापानानंतरच्या सत्रातला खेळ वाया गेला. दिवसाअखेरीस रोहित शर्मा नाबाद ११५ तर मयांक अग्रवाल नाबाद ८४ धावांवर खेळत होता.

अवश्य वाचा – Ind vs SA : रोहित-मयांक जोडीचा कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम

पहिल्यांदा फलंदाजी करताना दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीवर स्थिर होण्यासाठी थोडा वेळ घातला. मात्र मैदानात जम बसल्यानंतर मयांक आणि रोहितने चौफेर फटकेबाजी करत आफ्रिकन गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. आफ्रिकन कर्णधाराने भारताची ही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशीच ठरला. रोहित-मयांक जोडीने पहिल्या विकेटसाठी नाबाद २०२ धावांची भागीदारी केली.

कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सलामीवीर म्हणून एकत्र खेळणाऱ्या जोडीने शतक झळकावणारी ही तिसरी भारतीय जोडी ठरली आहे. याआधी २००५-०६ साली विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडने पाकिस्तानविरुद्ध आणि मुरली विजय-शिखर धवन जोडीने २०१२-१३ हंगामात ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतकी भागीदारी केली होती. पहिल्या दिवसाचं एक सत्र पावसामुळे वाया गेलं असल्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज कसा खेळ करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : मैदानावर पाऊल ठेवताच रोहित-मयांक ठरले अनोख्या विक्रमाचे मानकरी

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN