IND vs SA : पुन्हा एकदा रो'हिट'; षटकार मारुन साजरं केलं सहावं शतक

Indian News

Indian News

Author 2019-10-19 03:49:00

img

रांची, 19 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी सावरला आहे. सलामीवीर रोहित शर्माने षटकार मारून शतक साजरे केले. रोहितचे हे कसोटीमधील सहावे शतक ठरले. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय विराटने घेतला पण चहापानापुर्वीच तीन फलंदाज माघारी परतले. सलामीवीर मयंक अग्रवाल फक्त 10 धावांवर तर चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. त्याच्यानंतर कर्णधार विराट कोहलीला एनरिच नॉर्तजेनं बाद केलं. उपहारापूर्वी 37 षटकांत भारताच्या 3 बाद 143 धावा झाल्या होत्या.

प्रथम फलंदाजीला मैदानात उतरलेल्या भारताची अवस्था एकवेळ 15.3 षटकांत 3 बाद 39 अशी झाली होती. त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी शतकी भागिदारी करून डाव सावरला.

रोहित शर्माने या सामन्यात षटकार खेचून आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारण्याचा बहुमान पटकावला आहे. त्याच्या खात्यात 14 षटकार जमा झाले असून इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माने फक्त तिसऱ्या कसोटीतच ही झेप घेतली आहे.

भारतीय संघाने याआधीचे दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. विशाखापट्टणम इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात एक डाव 137 धावांनी मोठा विजय भारतानं साजरा केला. आता रांचीतील कसोटी जिंकून क्लीन स्वीपच्या इराद्याने भारतीय संघ खेळेल.

सामन्यावेळी नाणेफेकीसाठी एकूण तीन कर्णधार उतरले होते. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीला गेल्या सहा ते सात सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकता आलेली नाही. त्यामुळे नशीब आजमावण्यासाठी टेंबा बाबुमा त्याच्यासोबत नाणेफेकीसाठी आला होता. मात्र तरीही नाणेफेकीचा कौल विराटच्या बाजूने लागला. डुप्लेसी दहाव्यांदा आशियाई मैदानावर नाणेफेक हारला आहे.

तिसऱ्या कसोटीत शाहबाज नदीमला इशांत शर्माच्या जागी संघात स्थान मिळालं आहे. भारत तीन फिरकीपटूंसह खेळणार आहे. कुलदीप यादवला दुखापत झाल्यानं नदीमला संधी मिळाली. त्याच्याशिवाय रविचंद्रन अश्विन आणि जडेजा यांच्यावर फिरकीची भीस्त असेल.

भारतीय संघ : रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली(कर्णधार) , अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शाहबाज नदीम, उमेश यादव, मोहम्मद शमी

दक्षिण आफ्रिकेचा संघ : डीन एल्गर, क्विंटन डिकॉक, जुबेर हमजा, फॉफ डुप्लेसि (कर्णधार), टेंबा बावुमा, हेनरिक क्लासेन, जॉर्ज लिंडे, डेन पीट, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्तजे, लुंगी एनगीडी

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD