IND vs SA : पुन्हा दिसला रोहितचा 'हिटमॅन' अवतार, केला 'हा' नवा विक्रम

Loksatta

Loksatta

Author 2019-10-19 18:08:40

img

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीने भारताचा डाव सावरला. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे फलंदाज झटपट माघारी परतले. मात्र रोहित शर्माने अजिंक्य रहाणेच्या साथीने भारताचा डाव सावरला.

IND vs SA : ऐकावं ते नवलंच! खराब हॉटेल्स, जेवणावर आफ्रिकेने फोडलं पराभवाचं खापर

पहिल्या सामन्यात दोन शतके ठोकलेला रोहित दुसऱ्या डावात स्वस्तात बाद झाला होता. पण रोहितने तिसऱ्या सामन्यात दमदार फलंदाजी करत पुन्हा आपले ‘हिटमॅन’ रूप दाखवून दिले. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अव्वल स्थानावर आला. त्यानंतर आणखी षटकार ठोकत त्याने शतक झळकावले. त्याने खेचलेला षटकार हा रोहितचा मालिकेतील १६ वा षटकार ठरला. त्याचसोबत एका मालिकेत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम त्याने रचला. या आधी विंडिजच्या शिमरॉन हेटमायरने बांगलादेशविरूद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १५ षटकार लगावले होते. तो विक्रम रोहितने मोडीत काढला.

img

याशिवाय, रोहितने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील बेन स्टोक्सचा १३ षटकारांचा विक्रमदेखील मोडला. या यादीमध्ये रोहित आणि स्टोक्सच्या पाठोपाठ मयांक अग्रवाल (८ षटकार) आणि रविंद्र जाडेजा (७ षटकार) हे फलंदाज आहेत.

IND vs SA : …म्हणून शाहबाज नदीमला मिळालं संघात स्थान; विराटने सांगितलं कारण

दरम्यान, उपहारानंतरच्या सत्रात रोहितने आपलं अर्धशतक झळकावत भारताला शतकी धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. सुरुवातीचे ३ फलंदाज माघारी परतल्यानंतर आफ्रिकन गोलंदाजांचा संयमाने सामना करत रोहित-अजिंक्यने भारतीय संघाला सावरले. या दरम्यान रोहितने आपल्या ठेवणीतले काही खास फटकेही खेळले. उपहारापर्यंतच्या सत्रात रोहित शर्माने एक षटकार ठोकला होता. त्याचा हाच षटकार विक्रमी ठरला. त्यानंतर रोहित शर्माने दमदार षटकार लगावत शतकदेखील ठोकले.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD