IND VS SA : भारताचा दक्षिण आफ्रिकेला 'व्हाईटवॉश', 3-0 ने मालिका जिंकली

Indian News

Indian News

Author 2019-10-22 12:47:02

img

रांची - सध्या भारतीयांची दिवाळी सणाची तयारी सुरू आहे. मात्र, या दिवाळीच्या आधीच टीम इंडियाने देशाला दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आज चौथ्या दिवशी आफ्रिकेवर 202 धावांनी विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने आफ्रिकेला 'व्हाइटवॉश' दिला. भारताने ही मालिका ३-० ने जिंकली आहे.

दरम्यान, या तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला आणि ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. पहिल्या डावातील अपयशामुळे आफ्रिकेवर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD