Ind vs SA : मयांक अग्रवालचं शतक, तरीही चिंता कायम ! जाणून घ्या कारण...

Loksatta

Loksatta

Author 2019-10-11 11:29:09

img

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवसाअखेरीस सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे. सलामीवीर मयांक अग्रवालने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत भारताची बाजू मजबूत केली. दिवसाअखेरीस भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात २७३ धावांपर्यंत मजल मारली होती. मयांक अग्रवालने १९५ चेंडूत १०८ धावा केल्या. त्याच्या या खेळीत १६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

अवश्य वाचा – Ind vs SA : सलग दुसऱ्या कसोटीत मयांक अग्रवालचं शतक, विरेंद्र सेहवागशी बरोबरी

मयांक अग्रवालच्या या शतकी खेळीनंतरही त्याच्या फलंदाजीबद्दलची चिंता कायम आहे. आतापर्यंत मयांक अग्रवालने खेळलेल्या ६ कसोटी सामन्यांमध्ये ५ कसोटी सामन्यांत पहिल्या डावात मयांकने ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र दुसऱ्या डावात त्याची खेळी फारशी बहरत नाहीये.

मयांक अग्रवालच्या आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या डावातील धावा –

  • पहिला डाव – ७६, ७७, ५, ५५, २१५, १०८
  • दुसरा डाव – ४२, १६, ४, ७

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारताला आपलं पहिलं स्थान कायम राखायचं असल्यास या मालिकेत विजय मिळवणं गरजेचं आहे. मात्र पुण्याच्या गहुंजे मैदानातील अखेरच्या वन-डे आणि टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात विराटसेना कसा खेळ करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : पुणे कसोटी भारत गमावणार?? आकडेवारी ‘विराट’सेनेच्या विरोधात…

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN