Ind vs SA : रांची कसोटीत महेंद्रसिंह धोनी हजर राहणार

Loksatta

Loksatta

Author 2019-10-18 10:40:19

img

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानात अखेरच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. आपल्या घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी सामन्यात महेंद्रसिंह धोनीही हजेरी लावणार आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.

झारखंड क्रिकेट असोसिएशनने धोनीला सामन्यासाठी हजर राहण्याची विनंती केली होती, ज्याला धोनीने आपला होकार कळवला आहे. ज्यामुळे कसोटी सामन्यात प्रेक्षकांची संख्या अधिक वाढेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवत भारताला मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याची संधी आहे.

दरम्यान झारखंड क्रिकेट असोसिएशनने, केंद्रीय राखीव पोलिस दल, लष्कर आणि पोलिस दलातील अधिकाऱ्यांसाठी ५ हजार मोफत तिकीटं राखीव ठेवली आहेत. त्यामुळे अखेरच्या सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN