Ind vs SA : वन-डे, टी-२०, कसोटी; क्रिकेट कोणतंही असो सत्ता रोहितचीच !

Loksatta

Loksatta

Author 2019-10-02 16:34:57

img

लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय कसोटी संघात सलामीवीराची भूमिका बजावणाऱ्या मुंबईकर रोहित शर्माने आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं आहे. मयांक अग्रवालच्या साथीने भारतीय डावाची सुरुवात करताना रोहित शर्माने शतकी खेळीची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने रोहितचं हे पहिलं तर एकूण कसोटी कारकिर्दीतलं चौथं शतक ठरलं आहे. वन-डे, टी-२० आणि कसोटी या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने शतक झळकावणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

विशाखापट्टणमच्या मैदानात रोहितने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहितने १५४ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने आपलं शतक पूर्ण केलं. मयांक अग्रवालनेही त्याला दुसऱ्या बाजूने उत्तम साथ दिली.

अवश्य वाचा – Ind vs SA : कसोटीतही रोहितचं नाणं खणखणीत, ‘द वॉल’ राहुल द्रविडशी केली बरोबरी

दोन्ही फलंदाजांनी पहिल्या सत्रातील सुरुवातीचा अर्धा तास संयमी खेळ केला. यानंतर खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघांनीही आपल्या ठेवणीतले फटके खेळत आफ्रिकन गोलंदाजांना पुरतं बेजार केलं. भारताची ही जोडी फोडण्यासाठी आफ्रिकन कर्णधार फाफ डू प्लेसिसने बरेच प्रयत्न केले, मात्र भारतीय फलंदाजांनी त्याला दाद दिली नाही.

अवश्य वाचा – Ind vs SA : रोहित-मयांक जोडीचा कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN