IND vs SA : ...म्हणूनच विराट द्विशतक ठोकू शकला - लक्ष्मण

Loksatta

Loksatta

Author 2019-10-12 15:37:36

img

आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने दमदार खेळी केली. विराटने भारताच्या डावाला आकार देताना धमाकेदार नाबाद २५४ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या बळावर भारताने ६०० धावांपार मजल मारली. ६०१ धावांवर भारताने डाव घोषित केला. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात ३३६ चेंडूत २५४ धावांची खेळी केली. त्या खेळीत त्याने ३३ चौकार आणि २ षटकार लगावले.

विराटने या खेळीसह कसोटी कारकिर्दीतील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत प्रथमच २५० धावांचा टप्पा ओलांडला. जानेवारी २०१६ पासून विराट कोहलीचे तब्बल ७ वे द्विशतके ठरले. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. भारताचा माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मण याने विराटला शुभेच्छा तर दिल्याच पण त्याचसोबत विराट इतका यशस्वी फलंदाज कसा ठरतो आहे याचे कारणही सांगितले.

“कोहलीसारख्या खेळाडूसाठी सध्या फलंदाजी करणे म्हणजे एखाद्या गोलंदाजाविरूद्ध नव्हे तर एखाद्या विचारसरणीच्या विरोधात फलंदाजी करणे असे आहे. कोहलीने खेळताना केलेली पायांची हालचाल आणि फटक्यांची निवड अचूक होती. त्याच्या त्या फटकेबाजीने मला प्रभावित केले. त्याची फलंदाजीला उभे राहण्याची पद्धत, पुढे येऊन फटकेबाजी करण्याची लकब आणि ऑफ दिशेला फटका खेळण्याची कला यातील समतोल खरंच लाजबाव आहे. विशेष म्हणजे त्याला मैदानावर क्षेत्ररक्षकांच्या मधल्या रिकाम्या जागा शोधण्याची आणि त्यातून फटकेबाजी करण्याची दैवी देणगी आहे. त्या देणगीमुळे तो प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला आणि गोलंदाजांना दबावात टाकतो. त्याचेच कारण तो फलंदाजीत इतका यशस्वी ठरतो आहे. तशातच तो शुक्रवारी एका वेगळ्याच अंदाजात फलंदाजी करत होता, त्यामुळे त्याला द्विशतक ठोकणे शक्य झाले”, असे लक्ष्मण म्हणाला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN