IND vs SA 1st T20I: पावसामुळे टॉसशिवाय रद्द झाला पहिला T-20 सामना

TIMES NOW

TIMES NOW

Author 2019-09-15 21:50:09

img

धरमशालाः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन T-20 सामन्याची सीरिजचा पहिला सामना रविवारी पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. धरमशालामध्ये सतत पाऊस होता त्यामुळे टॉस देखील झाला नाही आहे. सामना सुरू होण्याची निर्धारित वेळ संध्याकाळी सात वाजता होती. तेव्हा 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं आवश्यक होतं. पावसामुळे अधिकाऱ्यांनी खूप वेळ वाट पाहिल्यानंतर जवळपास 7 वाजून 45 मिनिटांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दुपारीच धरमशालामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला होता. मात्र संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत पाऊस थोडा कमी झाला होता. त्यामुळे सामना होणार अशी आशा होती.

|K|

दोन्ही टीममध्ये सीरिजचा दुसरा सामना 18 सप्टेंबरला मोहालीमध्ये खेळला जाईल. आता भारतीय टीम मोहालीमध्ये विजयासोबत सीरिजमध्ये पदार्पण करण्यासाठी इच्छूक असेल. वेस्ट इंडिजला तीन फॉर्मेटमध्ये मात देणाऱ्या टीम इंडियाच्या अपेक्षा उंचावर आहेत. दक्षिण आफ्रिकेचा नवीन कॅप्टन डिकॉकच्या नेतृत्त्वात टीम पहिल्यांदा खेळण्यासाठी उतरेल आणि त्यांचे प्रयत्न एक नवीन सुरूवातच असेल. वर्ल्ड कपनंतरचा दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच दौरा आहे. अतिथी टीम आपल्या जुन्या चुका सुधारून चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल.


टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्या आल्यानं टीम मजबूत झाली आहे. विंडीजच्या दौऱ्यावर त्याला आराम दिला होता. पुन्हा एकदा भारतानं टी-20 मध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारला आराम दिला आहे. अशातच नवदीप सैनी, खलील अहमद यांच्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी आहे. याव्यतिरिक्त विडिंज दौऱ्यावर लेग स्पिनर राहुल चहरला केवळ एकच संधी मिळाली होती.संभाव्य टीमः

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंगटन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर आणि नवदीप सैनी

दक्षिण आफ्रीका: क्विंटन डिकॉक (कॅप्टन), रासी वान डर डुसैन, टेम्बा बावुमा, जूनियर डाला, बजरेन फॉट्यूइन, बेयुरान हेड्रिक्स, रीज हैड्रिक्स, डेविड मिलर, एनरिक नोर्टजे, आंदिले फेहुलक्वायो, ड्वायन प्रीटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी आणि जॉर्ज लिंडे.

READ SOURCE

Experience triple speed

Never miss the exciting moment of the game

DOWNLOAD