Ind vs SA 1st Test : पावसाच्या व्यत्ययामुळे उर्वरित दिवसाचा खेळ रद्द

Loksatta

Loksatta

Author 2019-10-02 18:12:32

img

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणमच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याला पावसाचा फटका बसला आहे. चहापानाच्या सत्रापर्यंत भारतीय फलंदाजांनी सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली आहे. सलामीवीर रोहित शर्माचं नाबाद शतक आणि मयांक अग्रवालने त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या दिवसाअखेरीस बिनबाद २०२ धावांपर्यंत मजल मारली आहे. चहापानाआधी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. यानंतर सामन्यात पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पंचांनी उरलेल्या दिवसाचा खेळ रद्द केला.

सलामीवीर रोहित शर्माने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत झळकावलेल्या शतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत चहापानापर्यंत आपलं वर्चस्व कायम राखलं. रोहित शर्माने चहापानापर्यंत १७४ चेंडूत नाबाद ११५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १२ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. पहिल्या सत्रानंतर भारतीय सलामीवीरांनी सामन्यावरची आपली पकड अधिक घट्ट केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत दोन्ही फलंदाजांनी खोऱ्याने धावा काढण सुरुच ठेवलं. त्याआधी, लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत भारतीय संघात स्थान मिळालेल्या रोहित शर्माने आश्वासक सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी उपहारापर्यंत ९१ धावांची भागीदारी करत भारताचं पारडं वर ठेवलं.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सराव सामन्यात रोहित शून्यावर बाद झाल्यामुळे रोहित आफ्रिकेच्या गोलंदाजांचा कसा सामना करतो हे सर्वांना पहायचं होतं. मात्र रोहितने संयमाने फलंदाजी करत खेळपट्टीवर स्थिर होण्याला वेळ दिला. यानंतर जम बसल्यानंतर रोहितने आपल्या ठेवणीतले फटके खेळले. दुसऱ्या बाजूने मयांक अग्रवालनेही त्याला चांगली साथ दिली. भारताची जोडी फोडण्याचे आफ्रिकेच्या गोलंदाजांचे प्रयत्न अपूरे पडले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आफ्रिकेचे गोलंदाज भारताची जोडी फोडण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN