IND vs SA 2nd Test Day 1: टीम इंडियाची खराब सुरुवात, Lunch पर्यंत भारताचा स्कोर 77/1

Indian News

Indian News

Author 2019-10-10 14:31:07

img

रोहती शर्मा, मयंक अग्रवाल (Photo Credits: BCCI-Twitter)

गुरुवारी, 10 ऑक्टोबरपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शेवटच्या सामन्याच्या दोन्ही डावात शतक ठोकणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) केवळ 14 धावा करून बाद झाला. सध्या मयांक अग्रवाल (Mayank Agrawal) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) क्रीजवर आहेत. लंचपर्यंत टीम इंडियाने 1 विकेट गमावून 77 धावा केल्या आहेत. कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याने आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. रबाडाने रोहितला क्विंटन डी कॉक याच्या हाती झेल बाद केले.

विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आफ्रिकेच्या संघाचा 203 धावांनी पराभव केला. यासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ( IND vs SA 2nd Test Day 1: दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावात रोहित शर्मा Fail, सोशल मीडियावर यूजर्सने केले मजेदार Tweets )

दरम्यान, या सामन्यासह विराट कोहली हा 50 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारा दुसरा कर्णधार ठरला आहे. माजी कर्णधार एमएस धोनी या यादीत भारतीय फलंदाजांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. धोनीने 60 टेस्ट सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहेत. आजच्या मॅचसाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू हनुमा विहारी याच्या जागी उमेश यादव याला स्थान देण्यात आले आहेत.

पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवत भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि दुसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवत मालिका खिशात घालण्याचा संघ प्रयत्न करेल. तर, आफ्रिकी संघासाठी विजय महत्वाचा आहे. आफ्रिकी संघ विजय मिळवत 1-1 ची बरोबरी करण्याच्या निर्धारित असेल. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने चांगला संघर्ष केला परंतु सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना भारतीय राहता आले नाही.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN