IND vs SA 2nd Test Day 2: विराट कोहली याचे शतक, Lunch पर्यंत भारताचा स्कोर 3 बाद 356 धावा

Indian News

Indian News

Author 2019-10-11 14:31:10

img

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघ (Photo Credit: Getty)

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडियाने दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या डावाच्या लंचपर्यंत3 बाद 356 धावा केल्या. भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील कसोटी मालिकेच्या दुसर्‍या सामन्याच्या दुसर्‍या दिवशी हा खेळ खेळला जात आहे. दुसर्‍या दिवसाच्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा लंच ब्रेक घेतला गेला आहे. खेळपट्टीवर विराट कोहली (Virat Kohli) 104 धावांवर नाबाद असून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) देखील नाबाद 58 धावांवर खेळत आहे. कोहलीने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यात 26 वे कसोटी शतक पूर्ण केले आहे. यात त्याने 16 चौकार ठोकले. कोहली आणि राहणे यांच्या जोरदार खेळीच्या जोरावर भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहचला आहे.

विराट आणि रहाणे या जोडीने शतकी भागीदारी केली. रहाणे आणि कोहलीची ही 10 वी शतकी भागीदारी आहे. ( IND vs SA 2nd Test Day 2: 26 वे टेस्ट शतक करत विराट कोहली ने केली स्टिव्ह स्मिथ, रिकी पॉन्टिंग यांची बरोबरी )

या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा बॅकफूटवर टाकले आहे. आता भारताला मोठी धावसंख्या उभारल्यानंतर लवकरात लवकर डाव घोषित करायचा आहे. कोहलीने पहिल्या डावात फलंदाजी करत कोहलीने 69 वे आंतरराष्ट्रीय शतक, भारतामधील 12 वे, दक्षिण आफ्रिकाविरूद्ध तिसरे, आशियातील 14 वे, वर्षातील पहिले आणि कर्णधार म्हणून 19 वे शतक करत अनेक विक्रम केले. यादरम्यान, टेस्ट संघाचा उपकर्णधार रहाणेनेदेखील अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने आपले अर्धशतक 141 चेंडूत पूर्ण केले, यामुळे टीम इंडियाला आता 400 ते 500 अशी मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असेल.

टॉस जिंकूनभारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशमुळे पाच षटकांपूर्वीचा संपवण्यात आला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कोहली आणि रहाणे नाबाद धावांवर खेळात होते. भारतासाठी पहिल्या दिवसाचा नायक मयंक अग्रवाल याने 108 धावांची शतकी खेळी केली आणि वीरेंद्र सेहवाग याच्यानंतर सलग दोन सामन्यात शतके ठोकणारा दुसरा सलामीवीर ठरला. मयंकने त्याच्या खेळीत 16 चौकार आणि 2 षटकार लगावले.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN