IND vs WI Test Match: बुमराहने रचला नवा इतिहास

TIMES NOW

TIMES NOW

Author 2019-09-01 08:26:21

img

किंग्सटन: टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह याने टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये एक नवा रेकॉर्ड करत इतिहास रचला आहे. शनिवारी वेस्ट इंडिज विरुद्धच्या टेस्ट सीरिजमधील दुसऱ्या मॅचमधील दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने 418 रन्स केले. यानंतर बॉलिंगसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहने जबरदस्त प्रदर्शन दाखवलं. बुमराहने आपल्या पहिल्या 5.5 ओव्हर्समध्ये 10 रन्स देत पाच विकेट्स घेतल्या आणि त्यामुळे वेस्ट इंडिजच्या टीमचा स्कोअर 12.5 ओव्हर्समध्ये 22/5 इतका झाला.

|K|

बुमराहच्या नावावर नवा रेकॉर्ड

या मॅचमध्ये बुमराह याने हॅटट्रिक सुद्धा घेतली आणि आपल्या नावावर नवा रेकॉर्ड केला. यापूर्वी हा कारनामा भारताच्या हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी केला होता. बुमराहने आफल्या 9व्या ओव्हरमधील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर वेस्ट इंडिजच्या बॅट्समनला माघारी धाडत हॅटट्रिक घेतली.

टेस्ट क्रिकेट इतिहासातील 44वी हॅटट्रिक

बुमराहने घेतलेली ही हॅटट्रिक टेस्ट क्रिकेट इतिहासातील 44वी हॅटट्रिक ठरली आहे. यापूर्वी टेस्ट क्रिकेटमध्ये शेवटची हॅटट्रिक इंग्लंडचा स्पीनर मोईन अली याने जुलै 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध ओवल येथे घेतली होती. गेल्या दोन वर्षांत कुठल्याच बॉलरने टेस्ट क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेतली नव्हती.

भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये हॅटट्रिक

हरभजन सिंग याने भारताकडून पहिली टेस्ट हॅटट्रिक घेतली होती. हरभजनने 2001 मध्ये कोलकाता येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये हॅटट्रिक घेतली होती. हरभजनने घेतलेली हॅटट्रिक भारतासाठी पहिली टेस्ट हॅटट्रिक होती तर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील 29वी हॅटट्रिक होती. त्यानंतर इरफान पठाण याने 2006 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये कराचीत टेस्ट हॅटट्रिक घेतली होती. इरफान पठाण याने घेतलेली ही हॅटट्रिक टेस्ट क्रिकेटमधील 36वी हॅटट्रिक होती.

|R|

35 बॉल्समध्ये पाच विकेट्स

जसप्रीत बुमराह याने आपल्या बॉलिंगचं जबरदस्त प्रदर्शन दाखवत सर्वात कमी बॉल्समध्ये पाच विकेट्स घेण्याचा नवा रेकॉर्डही कायम ठेवला आहे. बुमराहने 5.5 ओव्हर्समध्ये म्हणजेच 35 बॉल्समध्येच पाच विकेट्स घेतल्या. यामुळे वेस्ट इंडिजचा स्कोअर 22 रन्सवर 5 विकेट्स असा झाला होता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN