India vs Bangladesh : युवा ब्रिगेडची खरी कसोटी, भारताला 154 धावांचे आव्हान

Indian News

Indian News

Author 2019-11-07 21:02:00

img

राजकोट, 07 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात दुसरा टी-20 सामना राजकोटमध्ये होत आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना 153 धावांवर रोखले. भारताकडून युजवेंद्र चहलनं 2 तर वॉशिंग्टन सुंदर, दीपच चाहर आणि खलील अहमदनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांना चांगली सुरुवात करता आली नाही, मात्र 11 ओव्हरनंतर टीम इंडियानं सामन्यात कमबॅक केला. तरी, भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात अनेक नाट्यमय प्रकार घडले.

या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र रोहितचा हा निर्णय त्याला फळास येईल असे चित्र सुरुवातीला दिसत नव्हते.

रोहितनं संघात कोणतेच बदल केले नाही त्यामुळं या सामन्यातही भारताची मदार युवा खेळाडूंवर असणार आहे. मात्र या सामन्यात गोलंदाजांनी खराब सुरुवात केली.

खलील अहमदनं सामन्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा दिल्या. मात्र चहलच्या 6व्या ओव्हरमध्ये एक अजब प्रकार घडला. चहलच्या तिसऱ्या चेंडूवर लिंटन दास फलंदाजी करत होता. दास मोठा शॉट खेळण्याचा नादात क्रिझ सोडून पुढे गेला तेवढ्यात पंतनं त्याला स्टम्प आऊट केले. पंतनं जोरात केलेल्या अपीलमुळं पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावला आणि दासला नाबाद घोषित करण्यात आले. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मानं दासचा कॅच सोडला. अखेर आठव्या ओव्हरमध्ये पंतनं बदला घेत दासला माघारी धाडले.

बांगलादेशकडून लिंटन दास आणि मोहम्मद नैम यांनी 60 धावांची भागिदारी केली. त्यानंतर सोम्य सरकार आणि मोहम्मदुल्लानं 30 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजांला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं बांगलादेशला 153 धावापर्यंत मजल मारता आली.

रोहित शर्माची शतकी कामगिरी

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा राजकोटमध्ये बांगलादेशविरोधात मैदानात उतरताच एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला. आजचा टी-20 सामना हा रोहित शर्माचा 100वा सामना आहे. 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा दुसरा खेळाडू आहे.पाकिस्तानचा ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 111 सामने खेळले आहेत. त्यानंतर रोहित शर्मा आणि शाहिद आफ्रिदी यांचा क्रमांक लागतो. या दोन्ही खेळाडूंनी 99 सामने खेळले आहेत. पहिल्या टी-20 सामन्यात रोहितनं 99वा सामना खेळत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 98 सामने खेळणाऱ्या धोनीला मागे टाकले होते.

पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

डावखुरा युवा फलंदाज आणि युवा विकेटकीपर ऋषभ पंत सातत्याने दोन्ही विभागांत अपयशी ठरत आहे. त्यामुळे या सामन्यात फलंदाजीत पंतने छाप न पाडल्यास संजू सॅमसनसाठी संघाचे दरवाजे खुले होऊ शकतात. त्याशिवाय रिव्ह्य़ू घेण्याच्या त्याच्या क्षमतेवरसुद्धा अनेक प्रश्नचिन्हे उभी ठाकली आहेत.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कृणाल पांडय़ा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, दीपक चहर, यजुर्वेद्र चहल.

बांगलादेश : महमदुल्ला रियाद (कर्णधार), तैजूल इस्लाम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, मुशफिकर रहिम, अफिफ हुसैन, मोसादीक हुसेन सैकत, अमिनूल इस्लाम, अराफत सन्नी, अबू हैदर, अल-अमिन हुसैन, मुस्तफिझूर रेहमान, शफिऊल इस्लाम.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN