India vs Bangladesh : हाच तो क्षण, हीच ती चुक! अन् भारतानं गमावला सामना; पाहा VIDEO

Indian News

Indian News

Author 2019-11-04 15:28:00

img

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेश संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकत विजयी आघाडी मिळवली. नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यांत बांगलादेशनं भारतावर 7 विकेटनं विजय मिळवला. हा विजयासह बांगलादेशनं टी-20 क्रिकेटमध्ये एका इतिहासाची नोंद केली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये गेल्या 10 वर्षांतला भारताविरोधातला बांगलादेशचा हा पहिला विजय आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडच्या असंख्य चुका भारताला महागात पडला.

चहलच्या 18व्या ओव्हरमध्ये ऋषभ पंतकडून डीआरएसची झालेली चुक असो किंवा कृणाल पांड्यानं सोडलेला सर्वात महत्त्वाचा कॅच असो, या चुकांचा फायदा बांगलादेशला झाला.

शेवटच्या तीन ओव्हरमध्ये टीम इंडियानं हा सामना गमावला. 18व्या ओव्हरमध्ये जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या मुश्फिकुर रहीमचा कृणाल पांड्यानं झेल सोडला. त्यामुळं पुन्हा एकडा 'कॅचेस विन मॅचेस' हे खरे ठरले. मिडविकेटवर उभा असलेल्या कृणालनं सोपा कॅच सोडला. भारताचा फिरकी गोलंदाज चहलनं मुशफिकरला आपल्या जाळ्यात अडकवले होते, त्यामुळं स्वीप शॉट खेळण्याच्या नादात चेंडू कृणाल पांड्याच्या हातात गेला, मात्र कृणालनं हा कॅच सोडला. त्यामुळं बांगलादेशला जीवनदान तर मिळाले सोबत 4 धावाही मिळाल्या.

कृणालनं कॅच सोडल तेव्हा मुश्फिकुर रहीम 36 चेंडूत 8 धावांवर खेळत होता. मात्र या कॅचनंतर मुश्फिकुर रहीमनं तुफान फटकेबाजी करत 43 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार खेचत नाबाद 60 धावा केल्या. सामन्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कृणाल पांड्याची शाळा घेतली.

रोहितनं मान्य केल्या चुका

सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितलं की, फलंदाजांनी धावा केल्या होत्या. धावसंख्येचा बचाव करणं शक्य होतं. मात्र, मैदानावर आम्ही अनेक चुका केल्या आणि सामना गमावला. खेळाडुंचा अनुभव काही ठिकाणी कमी पडला. चुकांमधून ते शिकतील आणि पुढच्या वेळी चुका करणार नाहीत. डीआरएसमध्ये आमच्याकडून चूका झाल्या. रोहित शर्माने बांगलादेशच्या संघाचं विजयाबद्दल अभिनंदन केलं. रोहित म्हणाला की, बांगलादेश विजयाचे अधिकारी होते. जेव्हा आम्ही फलंदाजी करत होतो तेव्हापासूनच आमच्यावर दबाव टाकला होता. तसचं भारताकडून क्षेत्ररक्षणही खराब झाल्याचं रोहित म्हणाला.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN