India vs Bangladesh 1st T20: बांगलादेशचा भारतावर 7 विकेट्सनी विजय

TIMES NOW

TIMES NOW

Author 2019-11-04 07:52:37

img

नवी दिल्लीः मुश्फिकुर रहिमच्या शानदार हाफ सेन्चुरीमुळे बांगलादेशनं भारताला दिल्लीत खेळण्यात आलेल्या तीन सामन्याच्या सीरिजच्या पहिल्या T20 सामन्यात 7 विकेट्सनी पराभूत केलं. यासोबतच भारत विरूद्ध टी20 क्रिकेटमध्ये विजयाचं खातं उघडलं आहे. दोन्ही टीममध्ये आतापर्यंत खेळण्यात आलेल्या 9 सामन्यातला हा बांगलादेशचा पहिला विजय आहे. याआधी खेळण्यात आलेल्या आठही सामन्यात भारतीय टीमनं विजय मिळवला होता. विजयासाठी 149 धावांचं लक्ष्य बांगलादेशनं शेवटच्या ओव्हरमधल्या शेवटच्या 3 बॉलमध्ये मिळवलं.

मुश्फिकुर रहिम 43 बॉलमध्ये 60 धावा करून नाबाद होता. आपल्या खेळीत मुश्फिकुरनं 8 फोर आणि 1 सिक्स ठोकला. मुश्फिकुर रहिमला सौम्य सरकारनं साथ दिली. त्यानं 35 बॉलमध्ये 39 धावांची खेळी केली. बांगलादेशचा हा विजय यासाठीही महत्त्वपूर्ण आहे की, शाकिब अल हसन आणि तमीम इक्बालच्या या बांग्लादेशी टीमनं भारताला त्यांच्या होमगाऊंडवर पराभूत करण्यात यशस्वी ठरली आहे.

टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर बॅट्समन रोहित शर्माची काही जादू चालली नाही. रोहितनं केवळ 5 बॉलमध्ये 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शफीइल इस्लामनं पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना माघारी पाठवलं.

या सामन्यातून दोन खेळाडूंनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊलं ठेवलं. भारताकडून ऑलराऊंडर शिवम दुबे याला डेब्यू करण्याची संधी मिळाली तर बांगलादेशकडून मोहम्मद नईमनं डेब्यू केला. शिवम भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट खेळणारा 82 वा खेळाडू आहे. 26 वर्षीय दुबेनं स्थानिक क्रिकेटमध्ये आतापर्यंत 16 प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 48.19 च्या सरासरीनं 1012 धावा केल्यात. तर बॉलिंगमध्ये त्यानं 24.27 च्या शानदार सरासरीनं 40 विकेट्स घेतल्या.

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये खेळण्यात आलेला हा सामना आकडेवारीच्या दृष्टीनं ऐतिहासिक आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या खेळला गेलेला हा सामना 1000वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना आहे. टी20 क्रिकेटनं आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रवासाची 14 वर्ष पूर्ण केलीत. पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना 7 फेब्रुवारी 2005ला ऑस्ट्रेलियासोबत खेळवण्यात आला होता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN