India vs South Africa : कॅप्टन कोहलीचा स्पेशल रेकॉर्ड, 50वा कसोटी सामना ठरला खास

Indian News

Indian News

Author 2019-10-13 20:52:00

img

पुणे, 13 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट संघानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेला नमवतं, मालिका विजय मिळवला. भारतानं मायदेशात मिळवलेला 11वा मालिका विजय आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला एक डाव आणि 137 धावांनी नमवलं. कसोटी क्रिकेटमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं मिळवलेला असा हा 8वा विजय आहे.

पहिल्या डावात द्विशतकी खेळी केलेल्या विराटनं याआधीच आपल्या नावावर असंख्य विक्रमांची नोंद केली आहे. दरम्यान 50व्या कसोटी सामन्यात मालिका विजय मिळवणारा विराट हा पहिलाच कर्णधार असावा. तर, कर्णधार म्हणून एका डावासह सामना विजय मिळवणाऱ्या विराटनं या यादीत माजी कर्णधार अझरुद्दीनची बरोबरी केली आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली 8व्यांदा मिळवला एका डावानं विजय

कर्णधार म्हणून हा सामना विराटचा 50वा सामना होता. 50 कसोटी सामन्यात विराटनं तबब्ल आठव्यांदा एका डावानं विजय मिळवला आहे. याआधी भारताकडून माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी अशी कमाल केली होती. यासह विराटनं सौव गांगुलीचा विक्रम मोडला आहे. गांगुलीनं तब्बल 7वेळा एका डावानं विजय मिळवला आहे. तर, धोनीनं नव्यांदा अशी कामगिरी केली. आता विराट आणि अझरुद्दीन संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

दक्षिण आफ्रिका विरोधात सर्वात जास्त कसोटी विजय

विराट कोहली दक्षिण आफ्रिका विरोधात सर्वात जास्त मालिका विजय मिळवणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. तर, जगातला दुसरा कर्णधार आहे. विराटनं या विजयासह एल. हेसेटची बरोबरी केली आहे. हेसेटनं दक्षिण आफ्रिका विरोधात 6 कसोटी सामन्यात विजय मिळवले होते. दरम्यान कर्णधार म्हणून एका संघा विरोधात सर्वात जास्त मालिका विजय मिळवणाच्या यादीत रिकी पॉंटिंदग पहिल्या क्रमांकावर आहे. पॉटिंगनं एका संघाविरोधात 8 सामने जिंकले आहेत.

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

भारतानं दक्षिण आफ्रिकेला नमवत घरच्या मैदानात 11व्या कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. अशी कामगिरी करणारा टीम इंडिया पहिला संघ ठरला आहे. टीम इंडियाच्या घरच्या मैदानात कसोटी मालिकेच्या विजयाचा प्रवास हा 2015-2016मध्या झाला होता. त्यानंतर 2016-17मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया संघाला नमवलं. त्यानंतर 2018मध्ये श्रीलंकेविरोधात तर, 2018मध्ये अफगाणिस्तानविरोधात मलिका विजय मिळवला होता. 2013पासून टीम इंडियानं एकही सामना गमावलेला नाही. रिकी पॉंटिंगच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा हा पराक्रम केला होता.

READ SOURCE

⚡️Fastest Live Score

Never miss any exciting cricket moment

OPEN